अ‍ॅपल अन् ओपन AI च्या हातमिळवणीनंतर भडकला मस्क; थेट दिला निर्वाणीचा इशारा

  • Written By: Published:
अ‍ॅपल अन् ओपन AI च्या हातमिळवणीनंतर भडकला मस्क; थेट दिला निर्वाणीचा इशारा

Elon Musk declares ban on Apple devices in his companies : अ‍ॅपल आणि चॅटजीपीटीच्या ओपन AI हातमिळवणीनंतर टेस्लाचे सीईओ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स मालक इलॉन मस्कने (Elon Musk) मोठी घोषणा केली आहे. याबाबत मस्कने एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्याने या दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीवर नाराजी व्यक्त करत कडक इशारा दिला आहे.

मस्कची एक्स पोस्ट काय?

अ‍ॅपल आणि चॅटजीपीटी निर्माता ओपनएआय यांच्यातील भागीदारीनंतर मस्कने त्याच्या अधिकृत X हँडलवरून पोस्ट करत या भागीदारीबद्दल नाराजी व्यक्त केली. इतकचं नाही तर, मस्कने आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ॲपल उपकरणांवर बंदी घातली जाईल असा निर्वाणीचा इशार दिला आहे. एकतर हे भयानक स्पायवेअर थांबवा अन्यथा माझ्या कंपन्यांमध्ये अ‍ॅपलच्या सर्व उपकरणांवर बंदी घातली जाईल असा निर्वाणीचा इशारा मस्कने अ‍ॅपलला दिला आहे.

मस्क आणखी श्रीमंत होणार; एक्सवर पोस्ट, लाईक अन् रिप्लायसाठी यूजर्सना मोजावे लागणार पैसे

…तर येणाऱ्या गेस्टचे फोन जमा केले जातील 

दोन्ही कंपन्यांमधील भागीदारीनंतर हे सुरक्षिततेचे उल्लंघन असून, जे स्वीकारले जाऊ शकत नाही. त्यामुळे जर यावेळी वेळीच तोडगा काढला न गेल्यास माझ्या कंपनीत येणाऱ्या पाहुण्यांना कंपनीच्या गेटवरच अडवत त्यांची तपासणी केली जाईल. तसेच त्यांच्याकडे अ‍ॅपल अथवा तत्सम डिवाईस असतील तर ती जमा करून घेतली जातील आणि मगच त्यांना आत जाण्याची परवानगी दिली जाईल असे मस्कने म्हटले आहे.

अ‍ॅपल इतकाही स्मार्ट नाही …

अ‍ॅपल स्वतःचे AI तयार करण्याइतपत स्मार्ट नसल्याची टीकाही मस्कने त्याच्या पोस्टवर केली आहे. अ‍ॅपल यूजर्सच्या सुरक्षितेला आणि त्यांच्या गोपनीयतेला कोणताही धोका नाही याची खात्री करत असल्याचे मस्कने म्हटले आहे. पण ओपनएआयला युजरच्या डेटावर नियंत्रण मिळालं की काय होईल हे अ‍ॅपललाही माहीत नाही ही बाबही मस्कने अधोरेखित केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज