Download App

इंफ्लुएंसर्सच्या फुकट आर्थिक सल्ल्यांवर बसणार चाप ! ASCI कडून नवीन नियमावली जारी

New Guidelines for Influencers : आपण गुंतवणूक कशी करावी? याबाबत आर्थिक सल्ला देणारे अनेक सल्लागार आपल्याला सोशल मीडियावर भेटतात. पण अशा इंफ्लुएंसर्सच्या सल्ल्यांवर आता लगाम लागणार आहे. ASCI (भारतीय जाहिरात मानक परिषद) मार्केट रेगुलेटर ‘सेबी’ (SEBI) सोबत मिळून इंफ्लुएंसर्सच्या सल्ल्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याबाबत सातत्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येत असतात. पण आता आणखी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

कोणतीही आर्थिक माहिती नसताना इंटरनेटवर लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देणे, शेअर बाजारात पैसे गुंतवून खात्रीशीर परताव्याची हमी देणारे किंवा क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवण्याचे किंवा पैसे घेऊन कोणतेही आर्थिक उत्पादन खरेदी करण्यासाठी फायदेशीर करार सांगणाऱ्या इंफ्लुएंसर्सवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. अशा फसवणूक करणाऱ्या आर्थिक प्रभावांवर कारवाई करण्यासाठी ASCI ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Ghoomer Movie : अभिषेक-सयामीचा ‘घूमर’ निराशेच्या वातावरणात आशेचा किरण

इंफ्लुएंसर्ससाठी ASCI ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे
– एखाद्या इंफ्लुएंसर BFSI space म्हणजे बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात सामग्री तयार करत असले तर तसा कंटेन्ट तयार करण्याची त्याच्याकडे मान्यता असली पाहिजे.
– शेअर बाजार किंवा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत असल्यास त्याच्याकडे सेबी नोंदणी क्रमांक असावा आणि तो क्रमांक त्याच्या नावावर आणि पात्रतेमध्ये दिसला पाहिजे.
– जर तुम्ही फायनान्स बद्दल सल्ला देत असाल तर सीए,सीएस इत्यादींशी संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
– विमा पॉलिसी विकत असल्यास तुमच्याकडे IRDAI द्वारे दिलेला परवाना असणे आवश्यक आहे.
– आर्थिक नियामकांनी ठरवलेल्या कंटेन्टमध्ये जोखमीचे संपूर्ण प्रकटीकरण असावे.
– वित्त क्षेत्रात तयार केलेल्या प्रत्येक सामग्रीमध्ये प्रभावशाली व्यक्तीने त्याचा नोंदणी क्रमांक किंवा ओळख नमूद करणे आवश्यक आहे.

जसे की;
1) पॉडकास्ट असेत तर पॉडकास्टच्या सुरुवातीला ही माहिती सांगणे आवश्यक आहे.
2) व्हिडिओ असल्यास व्हिडिओच्या सुरुवातीच्या टिप्पण्यामध्ये माहिती सांगणे आवश्यक आहे.
3) ब्लॉग असेल तर ही माहिती वाचकांसाठी अगदी सुरुवातीला असावी.
4) ही माहिती व्हिडिओ किंवा फोटोमध्ये देखील सुपरइम्पोज केली जाऊ शकते.

Sonam Kapoor : मला कामाची प्रेरणा माझ्या वडिलांकडून मिळते; सोनम करणार कमबॅक

दरम्यान, ASCI ने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आधीच सांगितले आहे की AD किंवा जाहिरात शब्द वापरुन पैसे भरलेल्या प्रत्येक कंटेन्टला हे सांगणे आवश्यक आहे की हा कंटेन्ट ऑरगॅनिक नाही.

Tags

follow us