Kids Lunch Box: पालकांना जशी मुलांच्या शिक्षणाची, भविष्याची आणि लग्नाची काळजी असते. (Healthy Food ) त्याचप्रमाणे मुलांचा सांभाळ करताना, मुलांची वाढ होताना पालकांना त्यांच्या आहाराची सुद्धा काळजी असते. (Home Made Lunch Box ) ‘वाढत्या वयातली मुलांची जेवणावर असणारी नाराजी’, हे आपण नेहमीच ऐकतो. (Lifestyle News) शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.
त्यामुळे या मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जाण्यासाठी आई-वडील खूप मेहनत घेतात. तर काही ठिकाणी अनेक वेळेस पालकांना मुलांना योग्य आणि पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्यासाठी खूप कसरत देखील करावी लागते. आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात मुलांना निरोगी आणि पौष्टिक आहार देणं दुर्मिळ होत चाललेलं आहे. त्यामुळे आज या लेखातून आपण शाळकरी मुलांसाठी हेल्थी लंच बॉक्स कसा असला पाहिजे ते जाणून घेणार आहोत.
1. रात्रीचे उरलेले शिळे अन्न टाळा
रात्री उरलेले अन्न अनेक वेळेस आपण मुलांना त्यांच्या लंच बॉक्समध्ये देतो. पण दुपारच्या जेवणाची वेळ होईपर्यंत रात्री शिजवलेलं अन्न कितपत खाण्या योग्य राहत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? शाळकरी मुलांचा लंच ब्रेक होईपर्यंत रात्री शिजवलेल्या अन्नात कोणतीही पोषक तत्व शिल्लक राहत नाहीत आणि त्या अन्नाची चव सुद्धा बिघडते. आणि असं चव बिघडलेलं अन्न जर मुलांनी खाल्लं तर परिणामी मुलांना यांना तो विषबाधा होऊ शकते. त्यामुळे लहान मुलं काय तर मोठी माणसं असली तरीही रात्रीचं उरलेले क्षण अन्न डब्यात देणं टाळलं पाहिजे. पण, अन्नाची नासाडी न करता रात्री उरलेलं अन्न हे तुम्ही सकाळी नाष्टा मध्ये घेऊ शकता.
2. तळलेले पदार्थ टाळा –
जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. तळलेले पदार्थ जसे की फ्रेंच फ्राईज पेपर्स भजी वडा यांची जरी मुलांना क्रेझ असली तरीही पालकांनी कटाक्षाने मुलांना डब्यात हे पदार्थ देणार पाहिजे. तळलेल्या पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांना वजन वाढण्याची समस्या येऊ शकते. या उलट तुम्ही मुलांना डब्यात वाफवलेले, भाजलेले, शिजवलेले आणि ताजे, कमी मसाल्याचे, कमी तिखटाचे अन्न देऊ शकता आणि मुलांनाही हे खाण्याची सवय लावली पाहिजे.
Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?
3. मॅगी किंवा नूडल्स सक्तीने बंद करा
मुलांच्या लंच बॉक्समध्ये मॅगी किंवा नूडल्स देणे हे सक्तीने टाळायला पाहिजे. मैद्यापासून बनवलेले मॅगी किंवा नूडल्स हे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत. या उलट तुम्ही पौष्टिक गव्हापासून तयार केलेला वळवटाचा भात (शेवया) किंवा वळवटाची गोड खीर मुलांना डब्यात दिली तर मुलं ते आवडीने खातील. तर मुलांना मॅगी खाल्ल्याचाही फील येईल.