Rahul Gandhi On Election Commission : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गा्ंधींनी थेट निवडणूक आयोगावर वार केला आहे. (Election) ते म्हणाले, निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट नी समजून घ्यावी. तुम्ही तुमचं काम केलं नाही तर जेव्हा बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला दिला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या व्होट चारीच्या आरोपामुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. तर राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने देखील पत्रकार परिषद घेत त्यांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले.
तो हम हर जगह रायता फैलाएंगे; मतं चोरीच्या आरोपांवरून कंगनाचा राहुल गांधींचा निशाणा
शिवाय यावेळी आयोगाने पत्रकार परिषदेतून राहुल गांधींना इशारा दिला होता. मतचोरी सारख्या चुकीच्या शब्दाचा वापर करणं ह भारतीय संविधानाचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधींनी मत चोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसांत शपथपत्र सादर करावं किंवा देशाची माफी मागावी, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं होतं. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेनंतर आता राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोगाच्या तीनही आयुक्तांना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी तीनही आयोगाला आपलं का नीट करण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा कडक कारवाई करू असंही म्हटलं आहे.
बिहारमधील मतदार अधिकार यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी. जर तुम्ही तुमचं काम केलं नाही तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल. आता मोदींचं सरकार आहे ते ठीक आहे. पण कधी ना कधी एक दिवस बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल. तेव्हा आम्ही तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना दिला.