पुण्याला आज रेड अलर्ट! मुसळधार पावसाने झोडपले; चिंचवड, पाषाणमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस!

हवामान विभागाने आज पुण्याला रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणेकरांनी आज विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

Maharashtra Rain

Maharashtra Rain

Pune Rains : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात पावसाने (Pune Rains) उघडीप दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मावळ, मुळशी आणि खेड परिसरात 24 तासांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain in Pune) सुरू आहे. चिंचवडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पवना धरण सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत 98 टक्के भरले होते आता धरण शंभर टक्के भरल्याने शहराच्या पुढील वर्षीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

दरम्यान, पुण्यातही संततधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांना महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शिवाय असाच पाऊस सुरू राहिल्यास परिसरातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज पुण्याला रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणेकरांनी आज विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत पावसाचा कहर! सरकारचा मोठा निर्णय, शाळांसहर शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी

दुसरीकडे मुंबईसह मराठवाड्याला मान्सूनचा तडाखा बसल्याने (Maharashtra Rain) मुंबईत एक, मराठवाड्यात चार, तर विदर्भात दोन जणांचा मृत्यू झाला असून मराठवाड्यात 11 जण बेपत्ता आहेत. पावसामुळे मुंबईतील सर्व खासगी कार्यालये, आस्थापनांना आज मंगळवार 19 ऑगस्ट रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (IMD Rain Alert) आतापर्यंत पुण्यातील शिवाजीनगर परिसरात 35.2 मिमी, चिंचवड 39.5 ,तळेगाव 34.0, हडपसर 20.5, पाषाण 43.0, लव्हळे 46.5, मगरपट्टा येथे 20.5 मिमी इतका पाऊस पडला आहे.

Exit mobile version