मुंबईत पावसाचा कहर! सरकारचा मोठा निर्णय, शाळांसह शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी

मुंबई पोलिसांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. खूपच आवश्यक असेल तरच बाहेर पडा आणि प्रवासाचं नियोजन काळजीपूर्वक करा.

मुंबईत पावसाचा कहर! मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

Mumbai Rains Update : मुंबईत सकाळी 9 वाजता काळाकुट्ट अंधार, मेट्रो अन् गाड्यांच्या लाईट लागल्या, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, समोरचंही दिसेना अशी अवस्था सध्या झालेली आहे. मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबईत पुढील तीन ते चार तासांमध्ये अत्यंत तीव्र सरी बसरण्याचा अंदाज वर्तवला आहे. (Rains) सकाळी नऊ वाजले तरी मुंबईत रात्रीसारखा अंधार पसरला आहे. आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर काही अंतरावरचे दिसणेही अवघड झाले आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रेल्वे प्रवासी थेट उतरले रेल्वे ट्रॅकवर उतरले. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने ठाण्यातील कळवेकर रेल्वे प्रवासी थेट उतरले रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. कळवा परिसरातील रेल्वे कारशेट वरून सुटणाऱ्या रेल्वे ट्रेन पकडण्याकरिता नागरिकांची कारखेड ट्रॅकवर मोठी गर्दी. अनेक कळवेकर रेल्वे प्रवासी जीव धोक्यात टाकून भर पावसात रेल्वे ट्रॅक वरून ट्रेन पकडण्याचा करत आहेत प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईत पाऊस थांबायच नाव घेईना; परीक्षांबाबत मुंबई विद्यापीठाचा तडकाफडकी मोठा निर्णय

सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण 100% भरण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे 53 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे तसेच सुरू असलेल्या पावसामुळे कोयना नदीवरील जुना संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच मिस्त्री आणि तांबवे येथील बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. या परिसरात पाऊस वाढल्याने प्रशासनाकडून सूचना दिल्या जात आहेत.

कार्यालयांना सुट्टी

मुंबई महानगरपालिकेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेने यासोबतच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अत्यावश्यक कारणास्तव काम सुरु ठेवायचे असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित कार्यालयांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन करण्यात आले आहे.

follow us

संबंधित बातम्या