Download App

Ayushman Bharat Scheme : भारत गोल्डन कार्ड कसे काढाल ?

  • Written By: Last Updated:

Ayushman Bharat Scheme : आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना आहे. 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या सुरू करण्यात आली आहे. सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आली आहे.


राज्यात पाच उपमुख्यमंत्री असावे, देवाला आनंद होईल; बच्चू कडूंची सरकारवर खोचक टीका

आयुष्मान भारत योजनेतंर्गत अंगिकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्याला प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच पुरविण्यात येते. 5 लाखापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात. या योजनेत 1 हजार 209 शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार उपचार समाविष्ट आहेत. पुणे जिल्ह्यात 57 खासगी व 12 शासकीय अशा एकूण 69 रुग्णालयांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात 1 लाख 79 हजार 395 कुटुंबे आणि शहरी भागात 2 लाख 77 हजार 633 कुटुंबे अशी 4 लाख 57 हजार 28 कुटुंबे या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत.

जिल्ह्यात या योजनेचे एकूण पात्र लाभार्थी 16 लाख 88 हजार 678 असताना आतापर्यंत केवळ 4 लाख 26 हजार ३७३ लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले आहे.

Nobel Peace Prize 2023 : इराणच्या नर्सिस मोहम्मदी यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार, महिला अत्याचाराविरोधात उभारला लढा

ही खूप महत्त्वाची आरोग्य योजना आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत कार्ड तयार करुन घेणे आवश्यक आहे.
गोल्डन कार्ड काढण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थी स्वत: कार्ड काढू शकतो. तसेच आशा सेविकांनादेखील हे कार्ड काढण्यासाठी लॉगीन आयडी देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात 1 हजार 199 आशा सेविकांमार्फत कार्ड काढता येतील.

https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar या संकेतस्थळावर लाभार्थ्यांची यादी उपलब्ध आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

Tags

follow us