Download App

महिला दिनी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, ब्रेस्ट कँसर रुग्णांसाठी मोठं गिफ्ट

  • Written By: Last Updated:

मुंबई : सध्या राज्यात ब्रेस्ट कँसरच्या रुग्णानाचे प्रमाण वाढते असल्याचे दिसते. अगोदर हा आजार जास्त वयाच्या म्हणजे 60 वर्ष वयापुढील महिलांना व्हायचा मात्र आता हा आजार कमी वयातील महिलांना देखील होत असल्याने भीती वाढली आहे. परंतु या आजारबाबत महिला दिनी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. आज बुधवार असल्यामुळे आज पासून प्रत्येक बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ब्रेस्ट कँसर रुग्णांसाठी म्हणजे स्तनाच्या कर्करोगाच्या निदान व उपचारासाठी मोफत ओपीडी सुरू करण्यात येणार आहे.

चौथ्या कसोटीत इशान किशन की केएस भरत नेमकं कोणाला मिळणार संधी ? राहुल द्रविडने दिला इशारा 

या आजाराचे प्रमाण वाढल्यामुळे सर्वत्र या आजार विषयी माहिती दिली जाते, हा आजार झाला तर घाबरून न जात त्याला कसे सामोरे जावे, कसे निदान करावे, या विषयी राज्य सरकार वेगवेगळे शिबीर घेऊन माहिती देत आहे.

आज महिला दिना निमित्त ब्रेस्ट कँसरची माहिती देण्यासाठी तसेच उपचारासाठी मुंबईत रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाले. या रॅलीमध्ये 2 ते 3 हजार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. ही रॅली काळा घोडा ते सेंट जॉर्ज रुग्णालयापर्यंत काढण्यात आली.

Sharad Pawar : माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशीच आईने मला सभागृह दाखवलं!

या वेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले… दिवसेन दिवस व्यायामाचा अभाव पाहता महिलांमध्ये स्तन कर्करोग आजार वाढत असतांना दिसत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी स्तन कर्करोग जनजागृती व त्यावर उपचार ही काळाची गरज आहे. ग्रामीण, शहरी भागात आशा वर्कर, महिला बचत गट, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून याबाबत प्रत्येक घरी जाऊन माहिती देण्यात येणार आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी शासनामार्फत प्रत्येक बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या निदान व उपचारासाठी मोफत ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. तसेच या आजारावर घरच्या घरी निदान करण्यात यावे यासाठी टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Tags

follow us