Sharad Pawar : माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशीच आईने मला सभागृह दाखवलं!

Sharad Pawar : माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशीच आईने मला सभागृह दाखवलं!

मुंबई : कर्तृत्व हे काही फक्त पुरुषांमध्ये असते, हे काही मला मान्य नाही. संधी दिली आणि प्रोत्साहन दिले तर समाजातील कोणताही घटक यशस्वी होऊ शकतो. माझी आई शारदाबाई पवार (Sharda Pawar) स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होती. तसेच समाजकारणात देखील सक्रिय होती. माझा जन्म झाला तेव्हा तिसऱ्याच दिवशी ती लोकल बोर्डाच्या बैठकीला घेऊन मला गेली होती. त्यामुळे लोकसभा, विधानसभा असो की इतर कोणतेही सभागृहात आपण लोकांनी निवडून दिल्यावर जातो. मी मात्र जन्मल्यानंतर तिसऱ्याच दिवशी आईने मला सभागृह दाखवलं आहे, असा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या आईबद्दल ‘जागतिक महिला’ (World Women’s Day) दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगितला.

मुंबई येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले की, आज जगभर महिला दिन साजरा होत आहे. राज्य-केंद्र सरकार देखील महिला संबंधित कार्यक्रम घेत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही महिला आज यशस्वी होत असून त्यांचे कौतुक केलं जात आहे. त्याबद्दल आनंद वाटत आहे.

BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं बनणार सरकार

शरद पवार म्हणाले की, कर्तृत्व दाखवायला महिला कधीही मागेपुढे पाहत नाही. गरज आहे फक्त त्यांना प्रोत्साहन द्यायची. आपल्याला मिळालेल्या संधीमध्ये आपण समाजातील सर्व घटकाबरोबर एकत्रित काम केली पाहिजे. सर्वाना योग्य संधी दिली पाहिजे. मला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी वेगवेगळ्या खाते सांभाळत असतानाही मी महिला संदर्भातील खाते घेऊन महिलांशी संबधित निर्णय घेतले आहेत.

आज गावापातळीपासून म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा तसेच इतर क्षेत्रात महिला उत्तमरित्या काम करत आहेत. मी जेव्हा संरक्षण मंत्री होतो. तेव्हा सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध असतानाही संरक्षण क्षेत्रात महिलांसाठी ११ टक्के आरक्षण जाहीर केले. त्यामुळे जोखमीच्या, जड काम असूनही या क्षेत्रात महिला कुठेही कमी नाहीत. त्यामुळे जे अधिकारी विरोध करत होते. त्यांनी नंतर मान्य केले आहे, असे शरद पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube