चौथ्या कसोटीत इशान किशन की केएस भरत नेमकं कोणाला मिळणार संधी ? राहुल द्रविडने दिला इशारा

चौथ्या कसोटीत इशान किशन की केएस भरत नेमकं कोणाला मिळणार संधी ? राहुल द्रविडने दिला इशारा

India vs Australia 4th Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील अखेरचा सामना ९ मार्च रोजी अहमदाबादमध्ये होत आहे. ४ सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीकरिता अनुकूल अशी मानली जात आहे. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये केएस भरतची फलंदाजीतील वाईट कामगिरी लक्षात घेऊन भारतीय टीम व्यवस्थापनाने झारखंडचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला चौथ्या आणि अंतिम कसोटी सामना बोलावण्याचा मोठा निर्णय घेतला.

त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील समावेश करण्याची शक्यता आहे. केएस भरतला मागील वर्षापासून ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून तयार केले जात होते आणि तो भारत ‘अ’ संघाचा नियमित सदस्य होता. मात्र, तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या ३ कसोटी सामन्यांच्या ५ डावांत केवळ ८, ६, २३, १७ आणि ३ धावा केला आहे.

केएस भरतचे शांत आणि वळण घेणाऱ्या विकेट्सवर विकेटकीपिंग मात्र प्रभावी ठरणार आहे. इंदोरमध्ये तो अपयशी ठरला ही वेगळी गोष्ट. पण ५ डावामध्ये केवळ ५७ धावा करणे भारतीय संघाकरिता फायदेशीर ठरणार नाही. चेंडू वळण घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर धावा काढण्याकरिता भारतीय फलंदाज धडपडत असताना व्यवस्थापनाला चांगल्या खेळीची अपेक्षा राहणार होती.

चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याअगोदर, भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टीम इंडियाच्या फलंदाजीतील खराब फॉर्मबद्दल विचारले असता, तो त्याच्या बचावाकरिता पुढे आला. राहुल द्रविड म्हणाला, आम्ही फार काळजी करत नाही आणि भारतीय फलंदाज परत एकदा आव्हाने आणि परिस्थिती समजून घेतील. त्याने फार मोठे योगदान दिले नाही, तरी मागील सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १७ धावा केल्या.

Swara Bhaskar च्या वेडिंग पार्टी कार्डवर इन्कलाब जिंदाबादचा स्लोगन ‘हे’ आहे कारण…

तो पुढे सांगितल की, भरतने दिल्लीमध्ये उपयुक्त योगदान दिले जेथे त्याने सकारात्मक फलंदाजी केली होती. याबरोबरच, तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये थोडेसे नशीब हवे आहे जे कदाचित त्याच्यासोबत नसणार आहे. त्याच्या खेळात सुधारणा होत आहे, त्याने विकेटकीपिंग खूप चांगले केले आहे. यामुळे या दृष्टीकोनातून फलंदाजीत चांगली कामगिरी पाहण्याची गरज आहे. मंगळवारी नेट प्रॅक्टिसच्या दरम्यान द्रविडने इशान किशनबरोबर बराच वेळ घालवला आहे.

भारतीय संघाच्या सराव सत्रामध्ये मात्र संघ व्यवस्थापनाचा विचार स्पष्टपणे दिसून आला नसल्यानी आणि भरतला सराव सत्रात विश्रांती देण्यात आली. मात्र, तो बुधवारी सराव सत्रात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोटेराची विकेट फलंदाजीसाठी अनुकूल दिसते आणि त्यामध्ये जरी उसळी असली तरी ती इशान किशनच्या आक्रमक फलंदाजीसाठी योग्य राहणार आहे.

Team India Holi Celebration : ‘रंग बरसे’ गाण्यावर कोहली, रोहितचा ढासू डान्स; अशी साजरी केली धूळवड

दोन्ही संघातील खेळाडूंची यादी:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया: स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube