Brain Activity New Research : आज सोशल मीडियासह (Social Media) सर्व ठिकाणी मुलं (Boys) चांगली की मुली (Girls) चांगली अशी चर्चा होत असते मात्र आता एक नवीन रिसर्च (Research) समोर आला आहे. या नवीन रिसर्चनुसार लहान मुलींमधील मेंदूची क्रिया लहान मुलांपेक्षा अधिक गुंतागुंतीची असते. जर्मनीतील तुबिंगेन विद्यापीठात (Tübingen University) हा रिसर्च करण्यात आला आहे.
या नवीन रिसर्चमध्ये, संशोधकांनी मॅग्नेटोएन्सेफॅलोग्राफी (MEG) नावाच्या इमेजिंग तंत्राचा वापर करून भ्रूण आणि बाळांमध्ये मेंदूच्या विद्युतीय प्रवाहाद्वारे तयार केलेल्या चुंबकीय क्षेत्रांचे मोजमाप केले. 13 ते 59 दिवस वयोगटातील सुमारे 20 नवजात बालकांचा आणि 43 तिसऱ्या तिमाहीतील गर्भांच्या डेटाची या रिसर्चमध्ये समावेश करण्यात आला होता.
मुलांनी मुलींपेक्षा जलद विकास दर्शविला
रिसर्चमध्ये, संशोधकांना असं दिसून आले की, जेव्हा न्यूरोलॉजिकल सिस्टीम गर्भ आणि नवजात मुलांमध्ये वाढते, तेव्हा मेंदूतील सिग्नलची गुंतागुंत कमी होताना दिसते. मुलांमध्ये ही सिस्टीम मुलींपेक्षा फास्ट विकसित होते, यानंतर संशोधकांनी त्यांच्या चुंबकीय मेंदूची क्रिया ध्वनी उत्तेजित होण्याच्या प्रतिसादात मोजली त्यांनी विस्तृत मेट्रिक्स तयार करण्यासाठी अल्गोरिदम वापरले जे MEG सिग्नलची जटिलता दर्शवतात.
उच्च मेंदूची जटिलता आणि कमी मेंदूची जटिलता यातील फरक
रिसर्चनुसार , ज्या लोकांमध्ये मेंदूची जटिलता जास्त असते त्यांची कार्यक्षमता जास्त असते , ते लोक वेगाने निणर्य घेऊ शकतात तर ज्या लोकांमध्ये मेंदूची जटिलता कमी असते त्यांना सामान्य भूल आणि डोळ्यांची जलद हालचाल नसलेली झोप या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
राजकीय नेत्यांना भुरळ पाडणारा महंतच निघाला खुनी, मठात शिष्याची हत्या केल्यानंतर फरार
मेंदूच्या सिग्नलची जटिलता पुरुषांमध्ये वेगाने कमी होते
रिसर्चमध्ये संशोधकांना अशी अपेक्षा होती की, मेंदूच्या सिग्नल्सची जटिलता वाढेल कारण गर्भ वाढतो आणि मुले वृद्ध होतात मात्र त्यांना रिसर्चमध्ये असं आढळून आले की, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मेंदूच्या सिग्नलची जटिलता वेगाने कमी होत आहे. मात्र असं का होत आहे याचा कारण अद्याप स्पष्ट नाही.