Download App

पुणे विद्यापीठात नोकरीची संधी, रिसर्च फेलो पदांची भरती सुरू, महिन्याला 31 हजारांहून अधिक पगार

  • Written By: Last Updated:

Pune University Bharti 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow), सीनियर रिसर्च फेलो पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमदेवारांना ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. पुणे विद्यापीठ भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

भीषण अपघात! बस पुलावरून खाली रेल्वे रुळावर कोसळली, 4 जणांचा जागीच मृत्यू 

अर्ज करतांना उमेदवारांनी आवश्यक ती शैक्षणिक कागदपत्रे, आपले दोन पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो, सीनियर रिसर्च फेलो

एकूण पदांची संख्या – 3

शैक्षणिक पात्रता –

कनिष्ठ संशोधन फेलो: M.E./M.Tech. प्रथम श्रेणीसह पॉवर/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/साहित्य अभियांत्रिकी किंवा M.Sc. भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किमान 55% गुणांसह. NET/GATE परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. CSIR च्या नियमांनुसार इतर अटी व शर्ती.

वरिष्ठ संशोधन फेलो: एम.टेक. / M.E. किंवा किमान 60% गुणांसह अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील समकक्ष पदवी. किंवा M.Sc. भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किमान 55% गुणांसह आणि SCI (science citation indexes) जर्नलमध्ये प्रकाशन आणि M.Sc नंतर किमान दोन वर्षे पूर्ण केलेले असावे. संशोधनाचा अनुभव. CSIR च्या नियमांनुसार इतर अटी व शर्ती.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (ई-मेल)

निवड प्रक्रिया –
प्राप्त झालेल्या अर्जांपैकी पात्र उमदेवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यातून उमेदवारांची निवड करण्यात येईल.

मुलाखतीचा पत्ता –
सेंटर फॉर एनर्जी स्टडीज, टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – ४१००७

ईमेल पत्ता –

hodenergy@unipune.ac.in आणि

energyunipune@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – http://www.unipune.ac.in/

पगार –

ज्युनियर रिसर्च फेलो – रु.31 हजार + HRA (CSIR नियमांनुसार)

वरिष्ठ संशोधन फेलो – रु.35 हजार + HRA (CSIR नियमांनुसार)

असा अर्ज करा-

ज्युनियर रिसर्च फेलो, सीनियर रिसर्च फेलो पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल) अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा. कारण अर्जात कोणत्याही चुका झाल्यास अर्ज फेटाळल्या जाईल. शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज सबमिट करा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1Z6loiog5ZORxXXQy056X7A2OGi-Pirmz/view

Tags

follow us