Download App

अर्थसंकल्पात होणार मोठी घोषणा! राज्यात मुलींना उच्च शिक्षण मिळणार मोफत; ‘हा’ असणार नियम

Higher Education अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील मुलींच्या उच्च शिक्षणाबाबत मोठी घोषणा करण्यात येणार आहे.

Higher Education Free to Girls announcement in Session : देशात विद्यमान 18 व्या सरकारचं लोकसभेच पहिलं अधिवेश सुरू आहे तर महाराष्ट्रात विद्यमान सरकारचं शेवटचं अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Session ) दुसऱ्या दिवशी राज्यातील मुलींच्या उच्च शिक्षणाबाबत (Higher Education) मोठी घोषणा (announcement) करण्यात येणार आहे. त्यामध्ये मुलींच्या उच्च शिक्षण मोफत दिलं जाणार आहे. त्यामुळे एकीकडे महिलांसाठी लाडकी बहिण योजना तर मुलींना मोफत शिक्षण देऊन सरकारकडून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Jio ने ग्राहकांना दिला धक्का, अनलिमिटेड 5G प्लॅनमध्ये मोठी दरवाढ

तसेच ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे. त्या मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे. उच्च शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षण देखील मोफत करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तसेच राज्यात उच्च शिक्षणामध्ये अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील यासाठी विशेष अभियान देखील राबवले जाणार आहे.

Munjya ने बॉक्स ऑफिसला झपाटले! 20 व्या दिवशी सव्वाशे कोटींकडे वाटचाल

आजपासून विधानसभेचे या पंचवार्षिकमधील अखेरचं अधिवेशन (Monsoon Session ) सुरू झालं. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर जोरदा टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळालं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. शेतकरी, नीट परीक्षा या मुद्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा घेरलं. विधिमंडळाच्या आवाराता विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे हे अधिवेशन विदळी होण्याची शक्यता आहे. आज प्राथमिक कामकाज होऊन सभागृहाचं कामकाज उद्या 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

follow us

वेब स्टोरीज