Jio ने ग्राहकांना दिला धक्का, अनलिमिटेड 5G प्लॅनमध्ये मोठी दरवाढ

Jio Unlimited Plans New Rates : देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ (Jio) गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्रीमध्ये

Jio Unlimited Plans New Rates : Jio ने ग्राहकांना दिला धक्का, अनलिमिटेड 5G प्लॅनमध्ये मोठी दरवाढ

Jio Unlimited Plans New Rates : देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ (Jio) गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्रीमध्ये ग्राहकांना 5जी सेवा देत होता. मात्र आता जिओने मोठा निर्णय घेत फ्री 5 जी (5G) सेवांच्या रिचार्जमध्ये मोठी दरवाढ केली आहे. ज्याच्या फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनीने 5जी इंटरनेट आणि रिचार्जच्या दरात 20 ते 25 टक्के दरवाढ केली आहे. नुकतंच जिओने नव्या अनलिमिटेड वैधता प्लॅनची घोषणा केली आहे. कंपनीच्या नव्या प्लॅननुसार आता ग्राहकांना 28 दिवसांसाठी 5जी अनलिमिटेड सेवा (डेली 2 जीबी) घेण्यासाठी 189 रुपये मोजावे लागणार आहे मात्र त्यापूर्वी या प्लॅनसाठी फक्त 155 रुपये मोजावे लागतात होते.

तर दुसरीकडे 56 दिवसांच्या 5जी अनिलिमिटेड (डेली 2 जीबी) सेवेसाठी ग्राहकांना 629 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे तर यापूर्वी या प्लॅनसाठी ग्राहकांना 533 रुपयांचे रिचार्ज करावे लागत होते.

तर नवीन प्लॅननुसार ग्राहकांना 84 दिवस 5जी अनिलिमिटेड (डेली 2 जीबी) सेवेसाठी ग्राहकांना 859 रुपये मोजावे लागणार आहे तर यापूर्वी या प्लॅनसाठी ग्राहकांना 719 रुपये मोजावे लागत होते.

जिओने दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्लॅन 3 जुलै 2024 पासून लागून होणार आहे. म्हणजेच तुम्हाला 3 जुलैनंतर रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. जिओकडून झालेल्या दरवाढीनंतर देशाची दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एरटेल आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढ करणार का? हे पाहावे लागणार आहे.

Ajit Pawar : अजित पवारांनी सांगितला सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा अन् …

जाणून घ्या नवीन दरपत्रक (प्लॅन डेली 2 जीबी)

जिओकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना दररोज 28 दिवसांसाठी 5जी अनलिमिटेड वापरण्यासाठी 189 रुपये मोजावे लागणार आहे तर यापूर्वी हा रिचार्ज प्लॅन 155 रुपयांचा होता.

56 दिवसांसाठी 5जी अनलिमिटेड वापरण्यासाठी ग्राहकांना 629 रुपये मोजावे लागणार आहे त्यापूर्वी हा रिचार्ज 533 रुपयांचा होता.

84 दिवसांसाठी 5जी अनलिमिटेड वापरण्यासाठी ग्राहकांना 859 रुपये मोजावे लागणार आहे त्यापूर्वी हा रिचार्ज 719 रुपयांचा होता.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पडद्यामागे हालचाली सुरु, शिंदे गटाला फक्त ‘इतके’ मंत्रिपद?

तर वार्षिक डेली 2.5 जीबीच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 3599 रुपयांचा रिचार्ज आता करावा लागणार आहे. यापूर्वी हा रिचार्ज 2999 रुपयांचा होता.

follow us