Jio Down : मोठी बातमी! जिओ डाउन, हजारो लोकांचे इंटरनेट बंद

Jio Down : मोठी बातमी! जिओ डाउन, हजारो लोकांचे इंटरनेट बंद

Jio Down : आज देशभरातील अनेक जिओ यूजर्सना (Jio Users) मोठ्या नेटवर्क आउटेजचा (Network Outage) सामना करावा लागला आहे. ज्यामुळे अनेक यूजर्सना इंटरनेटशी कनेक्ट करण्यात आणि कॉल करण्यात अडचण येत होती.

डाउन डिटेक्टर (Down Detector) या प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, आज 2,400 हून अधिक जिओ यूजर्सना त्यांच्या जिओ कनेक्शनमध्ये समस्या येत होत्या. माहितीनुसार, आज दुपारनंतर अनेक जिओ यूजर्सला  कॉलिंग करण्यासाठी आणि इंटरनेट वापरण्यासाठी प्रॉब्लेम येत होत्या.

काय समस्या येत आहेत

डाउन डिटेक्टर या प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, जिओच्या नोंदवलेल्या समस्यांपैकी जवळपास निम्या कंपनीच्या ब्रॉडबँड सेवा JioFiber शी संबंधित होत्या. तर मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटीशी संबंधित 47%  समस्यांची नोंद करण्यात आली होती. तर 5% यूजर्सना मोबाईल नेटवर्कसंबंधी समस्या येत असल्याची नोंद करण्यात आली आहे.

तर अनेक जिओ यूजर्सनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आपली तक्रार नोंदवली आहे. अनेक यूजर्सनी एक्सवर इंटरनेट आउटेजची तक्रार केली आणि समस्येच्या व्याप्तीबद्दल चौकशी केली. याच बरोबर #JioDown आणि #InternetOutage X वर ट्रेंड करत होते. अनेक जणांनी अधिक माहितीसाठी Jio च्या अधिकृत अकाउंटला टॅग करत होते.

जिओची प्रतिक्रिया काय आहे?

तर दुसरीकडे अनेक यूजर्सना इंटरनेट वापरण्यास आणि कॉल करण्यास का अडचण येत आहे याबाबत जिओकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मुलीच्या ऍडमिशनसाठी बाप निघाला वाटेतच काळाचा घाला…

मात्र जिओकडून पुन्हा एकदा सर्विस सुरु करण्यासाठी काम सुरु करण्यात आला आहे आणि लवकरच सर्विस पुन्हा एकदा सुरु होणार अशी अपेक्षा आहे.

Alka Yagnik दुर्मिळ आजाराची शिकार, अचानक श्रवणशक्ती झाली कमी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज