मुलीच्या ऍडमिशनसाठी बाप निघाला वाटेतच काळाचा घाला…

मुलीच्या ऍडमिशनसाठी बाप निघाला वाटेतच काळाचा घाला…

Ahmednagar Accident : नगर तालुक्यातील इमामपूर (Imampur) घाटात एक भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, एक बाप आपल्या मुलीच्या ऍडमिशनसाठी (Admission) तिला घेऊन मोटरसायकल (Bike) वरती निघाला असता रोड न जाणाऱ्या एका कंटेनरशी (Container) त्यांच्या दुचाकीची धडक झाली.

या अपघातामध्ये मुलीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी ही जखमी झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप समजलेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, जून महिना सुरुवात झाला असून आता शाळा महाविद्यालय देखील सुरू झाली आहे. ऍडमिशनसाठी पालकांची धावा धाव देखील आता सुरू झाली असून यातच आपल्या मुलीचे ऍडमिशनसाठी निघालेल्या एका बापावरती काळाचा घाला आल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रत्यक्षदक्षिणी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला दुचाकीवरून जाणाऱ्या बाप लेकीच्या वाहनाची धडक बसली. हे दोघे नगरच्या दिशेने मुलीचे ऍडमिशन साठी येत होते मात्र यावेळी झालेल्या अपघातामध्ये बापाच्या जागीच मृत्यू झाला.

या अपघातामध्ये दुचाकी वरील मुलगी ही जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समजते आहे. अपघाताची माहिती समजतात एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाणेची पथक अपघात स्थळी दाखल झाले.

Alka Yagnik दुर्मिळ आजाराची शिकार, अचानक श्रवणशक्ती झाली कमी

दरम्यान अपघातानंतर इमामपूर घाटामध्ये वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. दुचाकी वरील मुलगी व तिचे वडील हे नेवासा तालुक्यातील असल्याची माहिती समजते आहे.

‘… तर मी 1 मतांनी मागे कसं काय?’, रवींद्र वायकरांचा विरोधकांना प्रतिसवाल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज