मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पडद्यामागे हालचाली सुरु, शिंदे गटाला फक्त ‘इतके’ मंत्रिपद?

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पडद्यामागे हालचाली सुरु, शिंदे गटाला फक्त ‘इतके’ मंत्रिपद?

Maharashtra Cabinet Expansion 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लवकरच राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहे.

तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात मंत्रिमंडळ विस्तारासाठी पडद्यामागे हालचाली सुरु झाल्या आहे तसेच अनेक आमदारांकडून देखील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची मागणी होत असल्याने पुढील काही दिवसात मंत्रिमंडळात विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याची अधिक माहिती अद्यापसमोर आलेली नाही.

तर दुसरीकडे सध्या सुरु असणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होती मात्र आता पावसाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असून तिथे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारातून 14 नवे मंत्रीपदं राज्याला मिळणार आहे. यामध्ये भाजपला 6 ते 8 तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला 4 ते 5 आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 ते 3 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

NEET UG Paper Leak Case मध्ये CBI ची मोठी कारवाई, 2 जणांना अटक

यापूर्वी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता मात्र राज्य सरकारमध्ये अजित पवार गटाची एंट्री झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळात शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून कुणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

Ajit Pawar : अजित पवारांनी सांगितला सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा अन् …

याचा कारण म्हणजे मंत्रि‍पदाच्या आशेपोटी अनेक आमदार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज