Munjya ने बॉक्स ऑफिसला झपाटले! 20 व्या दिवशी सव्वाशे कोटींकडे वाटचाल

Munjya ने बॉक्स ऑफिसला झपाटले! 20 व्या दिवशी सव्वाशे कोटींकडे वाटचाल

Munjya Movie 20 day Box Office collection : हॉरर कॉमेडी चित्रपट ‘मुंज्या’ (Munjya Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपले राज्य करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तिकीट काउंटरला मोठ्या प्रमाणात गर्दी पडली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून यासोबतच रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडमध्येही ‘मुंज्या’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यावर आता तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 20 व्या दिवशी देखील चित्रपटाची कोटींमधील कमाई सुरूच आहे. 20 व्या दिवशी मुंज्याने 2.49 कोटींची कमाई केली आहे.

‘त्या’ ऑडिओ क्लिपवरून मुंडे समर्थक आक्रमक; शिंदेंचे जिल्हाप्रमुख खांडेंचं ऑफिस फोडलं

‘मुंज्या’मध्ये ना मोठी स्टारकास्ट आहे ना तो मोठ्या बजेटमध्ये बनवला गेला आहे, पण त्याची कथा इतकी दमदार आहे की हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटर्सकडे खेचले जातात. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरप्राईज पॅकेज ठरला आहे. ‘मुंज्या’ला प्रेक्षकांचा एवढा उदंड प्रतिसाद मिळाला आहे की रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच त्याचे बजेट वसूल झाले आहे आणि आता तो प्रचंड नफा कमावत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिलीजचा तिसरा आठवडा गाठल्यानंतरही ‘मुंढ्या’ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पडद्यामागे हालचाली सुरु, शिंदे गटाला फक्त ‘इतके’ मंत्रिपद?

अवघ्या 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘मुंज्या’ने यावर्षी रिलीज झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने अक्षय-टायगरच्या 350 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवलेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि 200 कोटींच्या अजय देवगणच्या ‘मैदान’पेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे आजीवन कलेक्शन 65 कोटी रुपये असताना, मैदानाची कमाई केवळ 52 कोटी रुपयांपर्यंतच मर्यादित होती. तर ‘मुंज्या’ने 20 दिवसांत साधारणपणे 111.80 कोटी रुपये कमवून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज