मुंबईत कुठेही नि:शुल्क चित्रीकरण करता येणार; मंत्री आशिष शेलारांचा मोठा निर्णय

मुंबईत कुठेही नि:शुल्क चित्रीकरण करता येणार; मंत्री आशिष शेलारांचा मोठा निर्णय

Filming can be done anywhere in Mumbai for free; Minister Ashish Shelar’s decision : मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार व पारितोषिकांच्या वितरण सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व मंगळवारी मुंबईतील डोम एसव्हीपी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी मोठा निर्णय जाहीर केला.

मंत्री आशिष शेलारांचा मोठा निर्णय

मुंबईतील कोणत्याही लोकेशनवर चित्रीकरणासाठी परवानगी आता नि:शुल्क दिली जाणार आहे. तसेच राज्यातील विविध चित्रपट निर्मिती स्थळांवर सुलभ दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

ताडपत्री काढणार नाही, पुढील आदेशापर्यंत कबुतरखाना बंदच राहणार; BMC ची रोखठोक भूमिका

मराठी चित्रपटांचे जागतिक पातळीवर प्रमोशन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘एफएम’ रेडिओवर मराठी गाणे व कार्यक्रमांसाठी ठराविक वेळ देण्याबाबत एफएम रेडिओ चॅनेल्सशी चर्चा केली असून त्यासाठी पुरस्कार योजना देखील जाहीर केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

पहिली, दुसरीला एकच कविता; शिक्षण विभागाचा नवा घोळ आला समोर, नेमकं प्रकरण काय?

अमेरिका दौऱ्यात नेटफ्लिक्सच्या लॉस एंजेलिस येथील मुख्यालयात मराठी चित्रपटांना स्थान देण्याची मागणी केल्याचेही शेलार यांनी सांगितले. “मराठी सिनेमा, चित्रपटगृहे आणि निर्मात्यांना हक्काचे स्थान मिळावे, यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने काम करत असल्याचे सांगितले.

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गजलगायक भीमराव पांचाळे यांना “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पद्मश्री काजोल देवगण यांना स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024, पद्मभूषण अनुपम खेर यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024, अनिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 आणि निर्माते महेश मांजरेकर यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ब्रेन मॅटर डिजिटल अ‍ॅपचे लोकार्पण! अ‍ॅपच्या सहाय्याने मानसोपचार होणार सुलभ…

यावर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेला “छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025” हा युनेस्कोतील भारताचे कायस्वरूपी प्रतिनिधी राजदूत विशाल शर्मा यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, दुर्ग अभ्यासक माधव फडके यांना सन्मानित करण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube