प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट; 1 लाख 70 हजार कमावूनही महिना अखेरीस हात रिकामे

Couple Budget Story ईएमआय, कर्ज आणि महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलेल्या मध्यमवर्गाची धक्कादायक आर्थिक कहाणी...

Letsupp Image (55)

Letsupp Image (55)

Couple Budget Viral Story : आजच्या काळात चांगला पगार म्हणजे आर्थिक स्थैर्य, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, वास्तव अनेकदा वेगळेच असते. महिन्याला तब्बल 1.7 लाख रुपये कमावणारे एक विवाहित जोडपे सध्या आर्थिक तणावाचा सामना करत आहे. एक लाख सत्तर हजार रुपये मासिक उत्पन्न असूनही महिन्याच्या शेवटी हातात फक्त 2520 रुपये उरतात, असे त्यांनी म्हटलं आहे. नेमकी 30 वर्षीय विवाहित जोडप्याने रेडिट (Reddit) वर कोणती आर्थिक व्यथा मांडली आहे. ज्यामुळे हजारो भारतीय कुटुंबांचे डोळे पांढरे झाले आहेत.

‘मानसिकदृष्ट्या थकलो आहोत’

पर्सनल फायनान्सची गोष्ट शेअर करत या जोडप्याने त्यांचे उत्पन्न 1.7 लाख रुपये आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिन्याला 1.7 लाख रुपयांचे उत्पन्न असूनही सर्व खर्च व कर्जाचे हप्ते भरल्यानंतर हातात अवघे 2520 रुपयेच उरत असल्याची व्यथा या जोडप्याने त्यांच्या पोस्टमध्ये मांडत आर्थिक सल्ला मागितला आहे.

जोडप्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही महिन्याला 1.7 लाख रुपये कमावतो, पण तरीही पगार ते पगार असे जीवन जगत आहोत. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खूप थकलो आहोत आणि पुढे काय करावे हे समजत नाहीये. लग्नाला दोन वर्षे झाल्यानंतर त्यांनी प्रथमच आपल्या उत्पन्न आणि खर्चाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी समोर आलेली आकडेवारी पाहून त्यांनाही धक्का बसला.

Posts from the personalfinanceindia
community on Reddit

EMI नेच मोडली आर्थिक घडी

या जोडप्याच्या मासिक खर्चातील सर्वात मोठा वाटा कर्जाच्या हप्त्यांचा आहे. दर महिन्याला तब्बल 85,980 रुपये विविध कर्जांच्या EMI भरण्यात जातात. यामध्ये पर्सनल लोनपोटी 70,154, बाईक कर्जाचे 12,000, शैक्षणासाठी घेतलेल्या कर्जपोटी 3,000 तर, मोबाईलच्या EMIसाठी 826 रूपये जात आहे. याशिवाय घरखर्चासाठी आणखी 53 हजारांहून अधिक खर्च आहे.

वरील खर्चांसह EMI व्यतिरिक्त घरभाडे, सोसायटी मेंटेनन्स, किराणा, वीज-पाणी बिले, प्रवास आणि वैद्यकीय खर्च यासाठी दरमहा सुमारे 53,500 रुपये खर्च होतात. तसेच फिरणे, वैयक्तिक खर्च आणि कुटुंबीयांच्या छोट्या-मोठ्या गरजांसाठी आणखी 28 हजार रुपये बाजूला ठेवले जातात असल्याचे या जोडप्याने म्हटलं आहे. या सर्व खर्चांची बेरीज केल्यानंतर महिन्याच्या अखेरीस खात्यात फक्त 2520 रुपये उरतात.

भविष्याची चिंता वाढली

जोडप्याने सांगितले की, स्वतःचे घर घेणे, मुलांचे नियोजन, निवृत्तीसाठी बचत आणि आपत्कालीन निधी तयार करणे यासारख्या गोष्टींची त्यांना आता चिंता सतावत आहे. एवढे उत्पन्न असूनही बचत होत नसल्याने ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याची भावना व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावरून मिळाले सल्ले

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या जोडप्याना आर्थिक नियोजनाबाबत सल्ले दिले आहेत. या जोडप्याच्या अडचणीचे मूळ कारण घरखर्च नसून मोठ्या प्रमाणातील वैयक्तिक कर्ज आहे. वैयक्तिक कर्जाची परतफेड होईपर्यंत बचत करणे कठीण असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे. तर काहींनी जीवनशैलीवरील खर्चात कपात करण्याचा सल्ला दिलाय. फिरणे, मनोरंजन आणि इतर अनावश्यक खर्च कमी करून ती रक्कम कर्जफेडीसाठी वापरण्याचा मोलाचा सल्लाही काहींनी या जोडप्याला दिला आहे.

जास्त पगार म्हणजे जास्त बचतच असे नाही…

रेडिटवर व्हायरल होणारी या जोडप्याच्या पर्सनल फायनान्सची गोष्टी आधुनिक भारताचा आरसा आहे. अनेक कुटुंबे चांगली कमाई करत आहेत, पण त्यांना आर्थिक शांतता नाही. त्यांच्याकडे चांगला पगार आहे, पण बचत कमकुवत आहे. त्यांच्याकडे जीवनशैलीचा आराम आहे, पण आपत्कालीन निधी नाही. त्यांच्याकडे सामाजिक प्रतिष्ठा आहे, पण आर्थिक श्वास घेण्याची जागा नाही. हे नवीन मध्यमवर्गीय संकट आहे.

टीप : ही बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हायरल पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियांवर आधारित आहे. संबंधित दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.

Exit mobile version