Redmi Smartphones Discount Offers : तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात जर फोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी Redmi ने एक शानदार ऑफर जाहीर केला आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता दमदार फीचर्स आणि बेस्ट बॅटरी पावरसह येणारे फोन्स स्वस्तात खरेदी करु शकतात.
भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वी Redmi ने आपली नवीन Note 14 सीरीज सादर केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने Redmi Note 14 सह Redmi Note 14 Pro आणि Note 14 Pro + 5G फोन लाँच केले आहे. त्यामुळे कंपनी आता Redmi Note 13 सिरीजचे तीन फोन अतिशय स्वस्त दरात विकत आहे.
RedmiI Note 13 5G
या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता RedmiI Note 13 5G अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. भारतीय बाजारात हा फोन 20,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता मात्र आता तुम्ही हा फोन फक्त 14,542 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. याच बरोबर HDFC बँक क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे फोनवर 1,000 रुपयांची सूट आणि फेडरल बँक क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे 1250 रुपयांची सूट देखील तुम्हाला मिळू शकते.
Redmi Note 13 Pro 5G
तर दुसरीकडे Flipkart देखील Redmi Note 13 Pro 5G भन्नाट ऑफर देत आहे. भारतीय बाजारात हा फोन 28,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता मात्र आता हा फोन फक्त 17,946 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. तसेच या फोनवर HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI द्वारे 1200 रुपये आणि फेडरल बँक क्रेडिट कार्ड EMI द्वारे 1250 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
Redmi Note 13 Pro+ 5G
तर 200MP कॅमेरासह येणारा Redmi Note 13 Pro+ 5G देखील तुम्ही आता स्वस्तात खरेदी करू शकतात. Flipkart वर सुरू असणाऱ्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही हा फोन फक्त 22,380 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट; संदीप क्षीरसागर यांचा खळबळजनक दावा
भारतीय बाजारात हा फोन 33,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता मात्र आता या फोनवर तब्बल 11 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे. तसेच HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI द्वारे 1200 रुपये आणि फेडरल बँक क्रेडिट कार्ड EMI द्वारे 1250 रुपयांची सूट देखील उपल्बध आहे.