वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट; संदीप क्षीरसागर यांचा खळबळजनक दावा
Sandeep Kshirsagar Allegation VIP treatment to Walmik Karad : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केलेत. माध्यमांशी बोलताना संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) म्हणाले की, या प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराडचा विषय येतो, तेव्हा थोडंसं हे प्रकरण थांबल्यासारखं वाटतं. बाकीचे काही लोक सुपारी घेवून काम करत आहेत, परंतु यातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. अजून देखील ते कटकारस्थान रचल्याच्या आरोपाखाली कलम 302 खाली का अटक करत नाही, असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी केलाय.
आम्हाला जसजशी या प्रकरणाची माहिती (Santosh Deshmukh Murder Case) मिळतेय. ती आम्ही पोलीस प्रशासनाकडे पाठवत आहोत. सीडीआर काढायला वेळ किती लागतो, असा सवाल देखील संदीप क्षीरसागर यांनी केलाय. या प्रकरणात कराड सोडून अजून कोण आहेत. घटना घडल्यानंतर 12 तास उशिराने नोंद झाली. मग पोलीस अधिकाऱ्यांनी कोणी फोन केला, हे काढलं पाहिजे.
मुख्यमंत्री फडणवीस सध्या सहाव्या गिअरवर; बाकी मंत्री मात्र फक्त…काय म्हणाले आमदार रोहित पवार?
एखादा आरोपी अटक झाल्यानंतर अंगावरील दोरे, किंवा इतर काही गोष्टी असतील. त्या काढून आपण तुरूंगात टाकतो. आताही आपण कराडला पाहिलं तर हातातील दोरे तसेच आहेत. ही कोणती ट्रीटमेंट आहे. ही व्हिआयपी ट्रीटमेंटच आहे ना. धनंजय मुंडे स्वत: त्याचे निकटवर्तीय आहेत. म्हणूनच हा विषय होतोय ना, असं देखील क्षीरसागर म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले की, पुरावे आले की कारवाई करू. यावर बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, मोबाईलचे सीडीआर आहेत.28 तारखेला वाल्मिक कराड पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये होता. त्यावेळी त्याला कोणी अॅडमिट केलं, कोण-कोण भेटायला आलं? धनंजय मुंडेंनी या प्रकरणात नैतिकता दाखवावी, असं देखील वक्तव्य संदीप क्षीरसागर यांनी केलंय. जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा भेटेपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, असं क्षीरसागर यांनी म्हटलं.
बारामतीत ऊस उत्पादन वाढीसाठी AIचा वापर! सत्या नादेलांनी केलं कौतूक; पवारांनी केली खास पोस्ट…
मंत्र्याकडून वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट दिल्याचं दिसतंय, असा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय. याला आम्ही सुरूवातीपासून परळी पॅटर्न म्हणतोय. जमिनी हडपण्याचं प्रकरण चुकीचं आहे. सरकारने याची गंभीरपणे दखल घ्यायला पाहिजे. यामागे वाल्मिक कराड आहे. तो मुंडेंचा निकटवर्तीय असल्यामुळं त्याला ताकद मिळत आहे. वाल्मिक कराडसह या प्रकरणातील सर्व आरोपींचे मोबाईल रेकॉर्ड तपासले, तर बरंच काही बाहेर येईल असं देखील संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.