बारामतीत ऊस उत्पादन वाढीसाठी AIचा वापर! सत्या नडेलांनी केलं कौतूक; पवारांनी केली खास पोस्ट…

बारामतीत ऊस उत्पादन वाढीसाठी AIचा वापर! सत्या नडेलांनी केलं कौतूक;  पवारांनी केली खास पोस्ट…

Sharad Pawar: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चिंता असते ती उत्पादन वाढीची. यासाठी एक ना अनेक पर्यायांचा अवलंब केला जातो. दरम्यान, आता ऊस उत्पादन वाढीसाठी बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा (AI technology) वापर करण्यात आला असून त्याची दखल खुद्द मायक्रोसॉफ्टचे चेअरम सत्या नडेला (Satya Nadella) यांनी घेतली. नडेला यांनी या प्रयोगाचं कौतूक केलं. तर शरद पवारांनी (Sharad Pawar) या प्रयोगाची दखल घेतल्याबद्दल नादेला यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री फडणवीस सध्या सहाव्या गिअरवर; बाकी मंत्री मात्र फक्त…काय म्हणाले आमदार रोहित पवार? 

बारामतीमध्ये कृषी क्षेत्राला पुरक असे अनेक प्रयोग केले जातात. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मायक्रोसॉफ्ट सोबत करार केला होता. आणि हे एआय तंत्रज्ञान शेतीसाठीही क्रांतिकारक ठरलंय. एआयच्या माध्यमातून उसाची उत्पादन क्षमता वाढल्याचे बारामतीत दिसून आलं. त्यामुळे भारत दौऱ्यावर आलेले सत्या नडेला यांनी नुकतीच बारामतीला भेट देऊन ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारे शेतकरी सुरेश जगताप यांचे कौतुक केले. यासाठी त्यांनी बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी) चे वैज्ञानिक आणि मायक्रोसॉफ्ट एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली होती.

मुंबई, पुणे अन् हैदराबाद.. घरांची विक्री सुस्साट; श्रीमंती वाढली, १२ वर्षांचं रेकॉर्डही तुटलं 

नडेला यांनी ऊस लागवडीत केलेल्या प्रयोगांकडे विशेष लक्ष देत बारामतीचे कौतुक केले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ट्विट करून सत्या नाडेला यांचे आभार मानले आहेत.

सत्या नडेला यांनी एक्स अकाऊंटवर याबाबत ट्विट केलं. त्यांनी लिहिलं की, बारामती येथील ADT टीमला भेटून खूप आनंद झाला, जे आमच्या AI टूल्सचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम आणि शेतीमध्ये अधिक शाश्वत विकासासाठी मदत करत आहेत, असं नडेला यांनी म्हटलं. नाडेला यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कृषी विकास ट्रस्टचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नडेला यांच्या ट्विटला शरद पवारांनी धन्यवाद असं उत्तर दिलं. शेतीसाठी AI चे फायदे हायलाइट केल्याबद्दल आपले आभाार. बारामतीमधील शेतकऱ्याना AI चा लाभ मिळवून देण्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ADT सह आम्ही वचनबद्ध आहोत. कृषी प्रयोगांमध्ये तंत्रज्ञानाचा उत्तम वापर व्हावा यासाठी आम्ही मायक्रोसॉफ्टसोबत काम करण्यास कटिबद्ध आहोत, असेही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, राज्यातील 1000 शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर माध्यमातून एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ऊस या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. आता 16 ते 20 जानेवारी या कालावधीत बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येतंय. या प्रदर्शनादरम्यान शेतकऱ्यांना भविष्यातील शेती कशी असेल याचे प्रात्यक्षिकही बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पाहायला मिळणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube