Tata Motors Discounts Offers : देशाची लोकप्रिय ऑटो कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ऑगस्ट महिन्यात (August 2024) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या टाटा कार्सवर (Tata Cars) बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर केले आहे. यामुळे जर तुम्ही देखील ऑगस्टमध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
ऑगस्ट महिन्यात टाटा मोटर्स काही कार्सवर 70 हजार तर काही कार्सवर 1 लाखांपर्यंत सूट देत असल्याने सध्या बाजारात टाटा कार्स खरेदीसाठी सध्या गर्दी दिसून येत आहे. मग जाणून घेऊया कोणत्या कार्सवर टाटा किती डिस्काउंट देत आहे.
Tata Safari
टाटा मोटर्स ऑगस्ट 2024 मध्ये Tata Safari वर 70 हजारपासून 1.40 लाखांपर्यंत सूट देत आहे. कंपनी Tata Safari च्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही व्हेरियंटवर सूट देत आहे. ग्राहकांना Tata Safari मध्ये 2.0-लिटर, चार-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 170hp पॉवर आणि 350Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देखील देण्यात आले आहे.
Tata Harrier
याच बरोबर Tata Harrier वर देखील कंपनीकडून बंपर सूट देण्यात येत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये कंपनी या कारच्या सर्व व्हेरियंटवर 1.20 लाख पर्यंत सूट देत आहे. Harrier मध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 170 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. याच बरोबर या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील देण्यात आले आहे.
Tata Nexon
भारतीय बाजारात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार असणारी Tata Nexon वर देखील कंपनीकडून ऑगस्ट महिन्यात डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आले आहे. या कारवर कंपनीकडून 1 लाख पर्यंतची सवलत देण्यात येत आहे. भारतीय बाजारात दोन इंजिनसह ही कार सादर करण्यात आली आहे.
या कारचे 1.5-लिटर डिझेल इंजिन 115hp ची पॉवर देते आणि 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन 120hp ची पॉवर देते. त्यामुळे ही कार 17.44 kmpl पर्यंत मायलेज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच ग्राहकांना या कारमध्ये मस्त मस्त फीचर्स देखील कंपनीकडून देण्यात आले आहे.
Tata Tiago
तर दुसरीकडे टाटाकडून Tiago वर ऑगस्ट 2024 मध्ये 60,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. ज्यामध्ये 35 हजार रुपयांची रोख सवलत तर 20 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज/स्क्रॅपेज ऑफर आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. भारतीय बाजारात Tiago 1.2-लीटर, तीन-सिलेंडर NA पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे तर सीएनजीचा पर्यायही ग्राहकांना कंपनीकडून ऑफर करण्यात येत आहे.
Tata Tigor
Tata Tigor देखील या महिन्यात कंपनी 55 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. या कारमध्ये कंपनीने Tiago प्रमाणे 1.2-लीटर NA पेट्रोल आणि पेट्रोल + CNG पॉवरट्रेन देण्यात आले आहे. बाजारात या कारची एक्स शोरुम किंमत 6.30 लाख ते 9.55 लाखांदरम्यान आहे.
Tata Punch
याच बरोबर मायक्रो एसयूव्ही Tata Punch च्या प्युअर आणि प्युअर रिदम व्हेरियंट वगळता कंपनी इतर सर्व व्हेरियंटवर 18 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
भारतासाठी उद्याचा दिवस महत्वाचा, लोव्हलिना-लक्ष्य सेनकडे सर्वांचे लक्ष, जाणून घ्या वेळापत्रक
सध्या भारतीय बाजारात या कारचे सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील उपल्बध आहे. बाजारात या कारची एक्स शोरूम किंमत 6.13 लाख ते 10.20 लाख रुपये आहे.