Download App

दररोज फक्त 50 रुपये बचत करा अन् करोडपतीच व्हा; जाणून घ्या, मालामाल होण्याचं गणित

एसआयपी म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund) करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे.

SIP Calculation : एसआयपी म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund) करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. आज देशातील कोट्यवधी लोकांनी (SIP Calculation) म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी चांगली सेव्हिंग असली पाहिजे असा अनेकांचा गैरसमज आहे. पण असं काही नाही. जर तुम्ही दररोज काही पैशांची बचत केली तर भविष्यात तुम्ही मोठा फंड निश्चित तयार करू शकता.

दर दिवशी 50, 100, 500 रुपये बचत करून तुम्ही करोडपती नक्कीच बनू शकता. याच बरोबर तुम्हाला एसआयपी कंपाऊंडिंगचा सुद्धा फायदा मिळतो. इतकेच नाही तर इमर्जन्सी परिस्थितीमध्ये तुम्ही एसआयपी थांबवू शकता. तसेच एसआयपीमध्ये गुंतवणुकीची रक्कम पाहिजे तेव्हा वाढवू शकता.

कसा बनेल कोटींचा फंड

जर तुम्ही दररोज काही ठराविक रक्कम बचत केली तर काही कालावधीनंतर तुम्ही कोट्यावधी रुपये कमवू शकता. आता हे गणित नेमके कसे आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊ या..

आम्ही तुम्हाला आता जे कॅल्क्युलेशन सांगणार आहोत त्यात अनुमानित रिटर्न 12 टक्के आहे असे गृहीत धरले आहे. कारण म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये मिळणारा अनुमानित परतावा 12 टक्के असतो. तरीही हा परतावा बाजारातील चढ उतारावर अवलंबून असतो. असेही मानले जाते की एसआयपीमध्ये गुंतवणूकदाराला 12 ते 14 टक्के परतावा देखील मिळतो.

बापरे! Mobile App चोरताहेत तुमचा डेटा; Uninstall केल्यानंतरही सोडत नाहीत पिच्छा..

जर तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर फक्त 250 रुपयांपासून सुरू करू शकता. तसेच दररोज काही पैसे बचत करून एक कोटी रुपयांचा मोठा फंड तुम्ही सहज तयार करू शकता. चला तर मग आता हे गणित नेमके कसे आहे हेच समजून घेऊ या..

50 रुपये : जर तुम्ही प्रत्येक दिवशी 50 रुपयांची बचत करत असताल तर महिन्याला ही रक्कम दीड हजार रुपये होईल. एसआयपीमध्ये दर महिन्याला 1500 रुपये गुंतवणूक केली तर 37 वर्षानंतर 1 कोटी 4 लाख 9 हजार 777 रुपयांचा फंड तयार होईल. या 37 वर्षांत तुम्ही जवळपास 6,66,000 रुपयांचा फंड तयार करता. अशा पद्धतीने दररोज 50 रुपयांची तुम्हाला करोडपती बनवून जाईल.

100 रुपये : जर तुम्ही दररोज 100 रुपये बचत करत असाल तर महिन्याला ही रक्कम तीन हजार रूपये होईल. एसआयपीमध्ये दर महिन्याला तीन हजार रुपये गुंतवणूक केली तर 32 वर्षानंतर तुम्ही करोडपती बनू शकाल. या 32 वर्षांच्या काळात तीन हजार रुपयांच्या हिशोबनी तुम्ही 11 लाख 52 हजार रुपये गुंतवणूक करता. यामध्ये 12 टक्के परतावा जोडला तर ही रक्कम 1,16,75,513 रुपये इतकी होते.

काय सांगता! 25 वर्षांचं कर्ज फक्त 10 वर्षांत होईल क्लिअर; ‘या’ सोप्प्या टिप्स फॉलो कराच

500 रुपये : जर तुम्ही प्रत्येक दिवशी 500 रुपयांची बचत करत असताल तर dwr महिन्याला ही रक्कम 15 हजार रुपये इतकी होईल. एसआयपीमध्ये दर महिन्याला 15 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर फक्त 18 वर्षांत तुम्ही करोडपती बनू शकता. 12 टक्के परतावा मिळण्याच्या हिशोबाने आकडेमोड केली तर 18 वर्षानंतर ही रक्कम 1,06,75,929 रुपये इतकी होते.

follow us