काय सांगता! 25 वर्षांचं कर्ज फक्त 10 वर्षांत होईल क्लिअर; ‘या’ सोप्प्या टिप्स फॉलो कराच

काय सांगता! 25 वर्षांचं कर्ज फक्त 10 वर्षांत होईल क्लिअर; ‘या’ सोप्प्या टिप्स फॉलो कराच

Home Loan Tips : जर तुम्ही होम लोन घेतले असेल (Home Loan Tips) आणि या कर्जाचे नियमित हप्ते देखील भरत आहात तरी देखील टेन्शन असतेच. कारण एक जरी हप्ता वेळेवर भरला गेला नाही तरी क्रेडिट स्कोअर खराब (Credit Score) तर होतोच शिवाय बँकेचे वेगळे चार्जेस देखील द्यावे लागतात. कर्जाची मुदतही 20 किंवा 25 वर्षांची असते. त्यामुळे इतकी वर्षे नियमित हप्ते भरावेच लागतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की 25 वर्षे मुदतीने घेतलेले कर्ज तुम्ही दहा वर्षांतही मिटवू शकता. अशा कोणत्या टिप्स आहेत ज्यामुळे तुम्ही कर्जाचा भार लवकरात लवकर मिटवू शकता. आज याच बाबतीत माहिती घेऊ या..

50 लाखांच कर्ज अन् 40 हजार ईएमआय

एखाद्या कर्जदाराने 50 लाख रुपयांचे कर्ज 25 वर्षांच्या मुदतीने घेतलेलं असेल. बँकेने या कर्जासाठी साडेआठ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. या हिशोबाने मंथली ईएमआय 40 हजार रुपये होईल. सुरुवातीच्या टप्प्यात बँक कर्जावर व्याजाची जास्त वसुली करतात. म्हणजेच जर 40 हजार दरमहा प्रमाणे 4.80 लाख रुपयांचा भरणा केला तर यातील फक्त 60 हजार रुपयेच कर्जाच्या एकूण रकमेतून कट होतात. बाकीचे पैसे व्याजाचे असतात.

होम लोन, कार लोन, पर्सनल लोनचे दर कमी होण्याच्या मार्गावर;’RBI’ लवकरच घेणार मोठा निर्णय

या आहेत सोप्या टिप्स

अशा परिस्थितीत जर तुम्ही 25 वर्षांचे कर्ज फक्त 10 वर्षांत मिळवू इच्छित असाल तर यासाठी योग्य स्ट्रटेजी तयार करून पेमेंट करावे लागेल. यात पहिली पायरी म्हणजे तुम्ही दरवर्षी एक ईएमआय एक्स्ट्रा भरत चला. याचा फायदा म्हa णजे ही रक्कम तुमच्या कर्जाच्या प्रिन्सिपल अमाउंटमधून कट होईल. यामुळे कर्जाचा कालावधी 25 वर्षांवरून 20 वर्षांपर्यंत कमी होईल.

दुसरी महत्वाची पायरी म्हणजे तुम्हाला दरवर्षी तुमचा ईएमआय 7.5 टक्के दराने वाढवावा लागेल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा कर्जाचा कालावधी 25 वर्षांवरून थेट 12 वर्षांवर येईल. कर्जाचा कालावधी कमी झाल्याने तुम्हाला कमी कालावधीसाठी कमी रक्कम द्यावी लागेल. यामुळे कर्जाच्या चक्रातून तुम्ही लवकर मोकळे व्हाल.

तिसरी महत्त्वाची पायरी म्हणजे तुम्हाला दरवर्षी एक एक्स्ट्रा ईएमआय भरावी तर लागेलच पण त्याबरोबरच दरवर्षी ईएमआय 7.5 टक्के वाढवला. या दोन्ही गोष्टी तुम्ही बरोबर केल्या तर तुमच्या कर्जाचा कालावधी कमी होऊन थेट 10 वर्षांवर येईल.

Home Loans Subsidy : मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; होम लोनवर 9 लाख रुपयांपर्यंत सबसिडी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube