कर्ज घेण्याचा विचार पण CIBIL Score खराब? तर ‘ही’ महत्वाची गोष्ट जाणून घ्या, होईल फायदा

CIBIL Score : देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या या महागाईत अनेक जण आपल्या आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात पण हे तुम्हाला माहिती आहे की,तुम्हाला किती व्याजदराने कर्ज भेटणार हे तुमच्या CIBIL स्कोअर (CIBIL Score) अवलंबून असते. जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदरात आणि अगदी पटकन कर्ज मिळतो मात्र जर CIBIL स्कोअर खराब असेल तर कर्ज जास्त व्याजदरात देखील घ्यावा लागतो.
CIBIL स्कोअर म्हणजे काय?
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणजेच CIBIL ही देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय (RBI) द्वारे परवानाकृत क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आहे. कर्ज घेणाऱ्यांची माहिती आणि ते वेळेवर ईएमआय भरत आहेत की नाही याची नोंद ठेवणे हे या कंपनीने काम आहे. या कंपनीने दिलेल्या रेटिंगला CIBIL स्कोअर म्हणतात. आरबीआयच्या नियमांनुसार ही कंपनी दर 15 दिवसांनी CIBIL स्कोअर अपडेट करते.
CIBIL स्कोअर हा तीन-अंकी नंबर आहे, जो कर्ज घेणाऱ्याचा रेकॉर्ड दर्शवितो. कर्जची किती दिवसात आणि कोणत्या पद्धतीने परफेड केली हे रेकॉर्ड ठरवले जाते. CIBIL स्कोअर हा 300 ते 900 मधील एक आकडा आहे. जर तुम्ही कधी कर्ज घेतले असेल आणि तुमचा CIBIL स्कोअर 300 ते 600 च्या दरम्यान असेल, तर याचा अर्थ असा की तुम्ही वेळेवर हप्ता भरला नाही किंवा कर्ज वेळेवर परत केले नाही आणि जर तुमचा स्कोअर 750 ते 900 च्या दरम्यान असेल, तर तो सर्वोत्तम श्रेणीत येतो. याचा अर्थ असा की तुम्ही कर्जाचे सर्व हप्ते वेळेवर भरले आहेत आणि कर्जाची वेळेवर परतफेड देखील केली आहे.
CIBIL स्कोअर कधी खराब होतो?
कर्जाचा हप्ता न भरणे, कर्जाची परतफेड न करणे, क्रेडिट कार्डमधून वापरलेले पैसे न फेडणे आणि जरी तुम्ही कर्जाचे हमीदार असाल आणि पैसे घेणाऱ्या व्यक्तीने चूक केली असेल, तरीही तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. जर CIBIL स्कोअर खराब असेल तर अनेक बँका आणि कंपन्या क्रेडिट कार्ड देखील देत नाहीत. त्यामुळे CIBIL स्कोअर चांगले ठेवणे आवश्यक आहे. एकदा CIBIL स्कोअर खराब झाला की, तो सुधारण्यासाठी वेळ लागतो.
CIBIL स्कोअर एका दिवसात किंवा एका महिन्यात सुधारेल असा विचार करणे चुकीचे आहे. जर तुमचा CIBIL स्कोअर खराब झाला असेल, तर ओके करण्यासाठी किमान 6 महिने किंवा 1 वर्ष लागू शकते.
खराब CIBIL स्कोअर कसा सुधारायचा?
वेळेवर ईएमआय भरा
जर तुम्ही कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो. जर तुम्ही वेळेवर हप्ता भरलात तर तुमचा CIBIL स्कोअर ओके राहण्याची शक्यता जास्त आहे आणि यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज देखील सहज मिळू शकते.
क्रेडिट कार्ड
जर तुमचा CIBIL स्कोअर कमी झाला असेल, तर क्रेडिट कार्ड देखील तो सुधारण्यास मदत करू शकते. यासाठी देय तारखेपूर्वी क्रेडिट कार्ड बिल भरा. असे केल्याने तुमचा CIBIL स्कोअर सुधारू शकतो.
जामीनदार बनण्यापूर्वी विचार करा
जर तुम्ही एखाद्याचे कर्ज जामीनदार बनत असाल तर याबाबत थोडा विचार करा कारण ज्या कर्जदाराचे तुम्ही हमीदार आहात त्याने वेळेवर कर्ज फेडले नाही आणि कर्ज बुडले तर त्याचा परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होऊ शकतो.
कर्ज फेडल्यानंतर दुसरे कर्ज घेणे
अनेकदा लोक पहिले कर्ज फेडण्यापूर्वी दुसरे कर्ज घेतात आणि आर्थिक अडचणींमुळे वेळेवर कर्ज फेडता येत नाही, ज्यामुळे CIBIL स्कोअर खराब होतो. त्यामुळे चांगला CIBIL स्कोअर राखण्यासाठी प्रथम एक कर्ज फेडा आणि नंतर दुसरे कर्ज घ्या. अशा प्रकारे तुमचा CIBIL स्कोअर चांगला राहतो.