Home Loans Subsidy : मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; होम लोनवर 9 लाख रुपयांपर्यंत सबसिडी

Home Loans Subsidy : मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; होम लोनवर 9 लाख रुपयांपर्यंत सबसिडी

Home Loans Subsidy : शहरांमध्ये स्वत:चे घर घेण्याचे मध्यमवर्गीयांचे (lower middle class) स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि नंतर लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने होम लोन सबसिडी (Home Loans Subsidy) आणण्याची योजना आखली आहे. जर ही योजना प्रत्यक्षात आणली तर 50 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनवरील व्याजात 9 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

होम लोनवरील सबसिडीवर 60,000 कोटी रुपये खर्च करण्याची मोदी सरकारची योजना आहे. स्मॉल अर्बन हाउसिंग या योजनेच्या केंद्रस्थानी असतील, यावर सरकार पुढील 5 वर्षांसाठी होम लोनच्या व्याजवर सवलत देणार आहे. सुमारे 25 लाख होम लोन ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

‘इंडिया’चे जागावाटप तोंडावर अन् नितीश कुमारांची तिरकी चाल; भाजपसोबत जात पुन्हा पलटी मारणार?

होम लोनच्या व्याजावर असा मिळेल लाभ
सूत्रांच्या हवाल्यानुसार बँका ही योजना येत्या काही महिन्यांत सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने 20 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी गृहकर्ज घेतले तरच त्याला लाभ घेता येईल. या योजनेंतर्गत लोकांना गृहकर्जावर आकारण्यात येणाऱ्या वार्षिक व्याजावर सूट मिळेल. ते 3 ते 6.5 टक्के आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

सरकारने दिलेल्या सवलतीची रक्कम लाभार्थ्यांच्या होम लोन खात्यात आगाऊ जमा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे बाकी आहे. ही योजना 2028 पर्यंत लागू राहू शकते.

महाराष्ट्रात 49 अन् नागालॅंडच्या 7 आमदारांचा पाठिंबा; प्रफुल्ल पटेलांनी संख्याबळ मोजूनच दाखवलं

निवडणुकीच्या वातावरणात महागाईपासून दिलासा
अलीकडे, RBI ने रेपो दरात सातत्याने वाढ केल्यामुळे, गृहकर्ज EMI महाग झाला आहे. अशा परिस्थितीत सरकार निवडणुकीपूर्वी गृहकर्ज व्याज अनुदान योजना जाहीर करू शकते. गेल्या महिन्यातच सरकारने देशातील एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. आता प्रत्येकाला एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी दिली जात आहे, तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही सवलत 400 रुपये झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube