महाराष्ट्रात 49 अन् नागालॅंडच्या 7 आमदारांचा पाठिंबा; प्रफुल्ल पटेलांनी संख्याबळ मोजूनच दाखवलं
Prafulla Patel : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार(Ajit Pawar) आणि शरद पवार(Sharad Pawar) गटामध्ये धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार(Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर कारवाईचा पवित्रा शरद पवार(Sharad Pawar) गटाने घेतला. त्यानंतर आता हाच पवित्रा नागालॅंडच्या आमदरांविरोधातही घेतल्याचं दिसून येत आहे. त्याचं कारण म्हणजे नागालॅंड राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा देण्याच निर्णय घेतला. यासंदर्भात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी पटेल यांनी अजित पवार गटाला किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे मोजूनच दाखवल्याचं पाहायला मिळालं आहे.
आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार, लोकसभेचं गणित बिघडणार?
प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) म्हणाले, अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होण्याच निर्णय घेतल्यानंतर त्याचवेळी नागालॅंडच्या आमदारांनी अजित पवार यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. काही दिवसांपूर्वीच नागालॅंडची निवडणूक पार पडली. त्यावेळी माझ्या सहीनिशी आम्ही अधिकृतपणे एनडीएचा घटक पक्ष असल्याचं पत्रच दिलं असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रे पक्ष एनडीए पक्षाचा घटक पक्ष असल्याचंही ते म्हणाले आहेत.
नागपूर शहर चार तासात बुडालं, हाच का तुमचा विकास? राऊतांचा फडणवीसांना सवाल
सध्या महाराष्ट्रातून अजित पवार गटाला 43 विधानसभेचे आमदार, 6 विधानपरिषदेचे तर नागालॅंडच्या 7 आमदारांचा पाठिंबा आहे. आता शरद पवार गटाकडून आमदारांवर कारवाई करण्याची मागणी होतं आहे, आम्हीही नागालॅंड विधानसभा अध्यक्षांना पत्रद्वारे आमचं म्हणणं मांडलं असून याची चाचपणी आधी निवडणूक आयोगाकडे होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Chandrashekhwar Bawankule : ‘2024 नंतर विरोधकांकडे विरोधी पक्षनेताच राहणार नाही’…
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत केस सुरु आहे, मात्र, आमची केस ही शिंदे यांच्या बंडप्रकणापेक्षा वेगळी आहे. त्यांच्या केसबद्दल मी काही भाष्य करणार नाही, पण आम्ही कायदेशीर बाबी तपासूनच सत्तेत सामिल होण्याचा निर्णय घेतला असल्याचं पटेल म्हणाले आहेत.
दरम्यान, नागालॅंडचे आमदार तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीचा मोठा गट अजित पवारांसोबत सत्तेत सामिल झाला, मात्र, काही दिवसांपूर्वीच नागालॅंडमध्ये निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आमदारांनी एनडीएला पाठिंबा जाहीर केला होता. यासंदर्भातील पत्रव्यवहार प्रफुल्ल पटेलांनी केला असल्याचा दावा पटेल यांनी यावेळी केला आहे.