Festive Season Car Offers : येत्या काही दिवसात भारतात सणासुदीला (Festive Season 2024) सुरुवात होणार आहे. जर तुम्ही देखील या सणासुदीत कमी बजेटमध्ये नवीन कार (New Car) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारतीय बाजारात तुमच्यासाठी 5 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणाऱ्या कार्स उपलब्ध झाले आहे.
Maruti Suzuki Alto K10
या सणासुदीत तुम्ही तुमच्यासाठी 5 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये Maruti Suzuki Alto K10 खरेदी करू शकतात. या कारची भारतीय बाजारात एक्स-शोरूम किंमत 4.96 लाख रुपये आहे. तसेच या कारमध्ये कंपनीकडून 1-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन देण्यात आले जे 67 पीएस आणि 89 एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT गिअरबॉक्ससह येते.
Maruti Suzuki S-Presso
Maruti Suzuki Alto K10 सह तुम्ही Maruti Suzuki S-Presso कार खरेदी करण्याचा देखील विचार करू शकतात. या कारमध्ये देखील तुम्हाला 1-लिटर पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. जे 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम पीक टॉर्क जनरेट करते तसेच या कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT सह जोडलेले आहे आणि भारतीय बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे.
Renault Kwid
भारतीय बाजारात कमी किमतीमुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी Renault Kwid देखील तुम्ही खरेदी करण्याचा विचार करू शकतात. या कारमध्ये तुम्हाला 1-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले जे 68 PS ची पॉवर आणि 91 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. भारतीय बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपये आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये रेकॉर्ड ब्रेक वोटिंग, 5 वाजेपर्यंत 65.48 टक्के मतदान
Maruti Suzuki Celerio
तुम्ही जबरदस्त मायलेज आणि बेस्ट फीचर्ससह Maruti Suzuki Celerio देखील कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. या कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 67 PS पॉवर आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट तसेच या कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख रुपये आहे.