जम्मू-काश्मीरमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ वोटिंग, 5 वाजेपर्यंत 65.48 टक्के मतदान
Jammu Kashmir Election 2024 : जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या (Jammu Kashmir Election 2024) तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी (Phase 3) आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.48 टक्के मतदान झाले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सात जिल्ह्यांमध्ये मतदान शांततेत पार पडले आहे. या सात जिल्ह्यात लोकसभा 2024 साठी 66.78 टक्के इतका मतदान झाला होता अशी देखील माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
आज जम्मू, सांबा, कठुआ आणि उधमपूर जिल्ह्यात तर खोऱ्यातील बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यातील 40 विधानसभा जागांवर मतदान पार पडले. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबरला मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 61 टक्के मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यात अंदाजे 57.3 टक्के मतदान झाले तर आज तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.48 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बांदीपोरामध्ये 63 टक्के, बारामुल्लामध्ये 55 टक्के, जम्मूमध्ये 66 टक्के, कठुआमध्ये 70 टक्के, कुपवाडामध्ये 62 टक्के, सांबामध्ये 72 आणि उधमपूरमध्ये 72 टक्के मतदान झाले आहे.तर दुपारी तीन वाजेपर्यंत 56 टक्के मतदान झाले होते. तिसऱ्या टप्प्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून 5,030 मतदान केंद्रे तयार करण्यात आले होते.
Election Commission of India says, “Elections to the phase 3 of the Assembly Elections in J&K recorded 65.48% polling as of 5 PM today which is going to surpass the Lok Sabha 2024 voter turnout in these 7 districts which was 66.78%. The voter turnout in Phase 1 and Phase 2 of the…
— ANI (@ANI) October 1, 2024
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालसह 08 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये मुख्य लढत नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपमध्ये पाहायला मिळाली आहे.
शरद पवारांनी दीड तास क्लास घेतला अन्…, समरजीत घाटगेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेससोबत तर भाजपने पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसोबत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये 08 ऑक्टोबर रोजी कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.