Download App

सेंट्रल बॅंक इंडियामध्ये दहावी पास उमदेवारांसाठी नोकरीची संधी, महिन्याला 28 हजाराहून अधिक पगार

  • Written By: Last Updated:

Central Bank of India Recruitment 2023: आज अनेक जण नोकरीच्या (Job) शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं आहे. दरम्यान, जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India) सब स्टाफ अर्थात सफाई कर्मचारी पदे भरण्यासाठी भरती जाहिर केली. या भरतीसाठी उमेदवार Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतो. या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

काँग्रेसमध्ये फेरबदल; तेलंगणामध्ये विजय मिळवून देणाऱ्या प्रभारीकडे महाराष्ट्राची जबाबदारी 

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी तुम्ही 9 जानेवारी 2024 किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता. या भरती अंतर्गत, सफाई कर्मचारी म्हणून उप-कर्मचाऱ्याच्या एकूण 484 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांवरील उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीच्या आधारे केली जाईल. या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाईल.

महत्वाची बाब अशी की, उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले किंवा चुकीचे माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळं अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

पवारांच्या विद्या प्रतिष्ठानच्या एका प्रकल्पासाठी गौतम अदानींकडून तब्बल 25 कोटींची मदत ! 

अर्जाची फी
अर्जाची फी उमेदवारांच्या श्रेणीनुसार बदलते. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १७५ रुपये (जीएसटीसह) भरावे लागतील तर इतर सर्व उमेदवारांना ८५० रुपये (जीएसटीसह) भरावे लागतील.

पात्रता
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे.

वय श्रेणी
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे. याशिवाय सरकारी नियमांनुसार वयातही सवलत दिली दिली जाणार आहे. मागास प्रवर्गासाठी 5 वर्ष तर इतर मागास प्रवर्गासाठी 3 वर्षाची सुट आहे.

अर्ज फी
SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 175 रुपये (जीएसटीसह) भरावे लागतील, तर इतर सर्व उमेदवारांना 850 रुपये (जीएसटीसह) भरावे लागतील.

वेतनश्रेणी – 14 हजार 500 रुपये ते 28 हजार 145 रुपये.

जाहिरात- https://centralbankofindia.co.in/sites/default/files/NOTIFICATION_RECRUITMENT_OF_SAFAI_KARMACHARI_CUM%20SUB_STAFF%20AND_OR%20SUB_STAFF%202024_25.pdf

अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.centralbankofindia.co.in/en

Tags

follow us