काँग्रेसमध्ये फेरबदल; तेलंगणामध्ये विजय मिळवून देणाऱ्या प्रभारीकडे महाराष्ट्राची जबाबदारी

काँग्रेसमध्ये फेरबदल; तेलंगणामध्ये विजय मिळवून देणाऱ्या प्रभारीकडे महाराष्ट्राची जबाबदारी

Maharashtra Congress : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तेलंगणा वगळता चार राज्यात मोठा पराभव स्वीकारवा लागला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी (LokSabha Elections 2024) काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल झाले आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त केले आहेत. केरळमधील काँग्रेस नेते रमेश चेनिथल्ला (Ramesh Chenithalla) यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहेत रमेश चेनिथल्ला?
तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी रमेश चेनिथल्ला यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी तेलंगणा काँग्रेसला एकसंध करत पक्षाला विजय मिळून दिला आहे. यापूर्वी प्रभारी असलेले एच. के. पाटील कर्नाटक सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राचे प्रभारी पद रिक्त होतं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील गटातटात विभागलेल्या काँग्रेसला एकसंध करण्याचे आव्हान रमेश चेनिथल्ला यांच्यापुढे असणार आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या जागी अविनाश पांडे यांना यूपी काँग्रेसचे प्रभारी बनवण्यात आले आहे. आता प्रियांका गांधी यांच्याकडे कोणत्याही राज्याची जबाबदारी नाही. त्याचबरोबर सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. कुमारी सैलजा यांच्या जागी पायलटची नियुक्ती करण्यात आली आहे.

शरद पवारांच्या आणखी एका नातवाची होणार राजकारणात एंट्री? कोण आहेत युगेंद्र पवार?

याशिवाय रमेश चेनिथल्ला यांना महाराष्ट्राचे प्रभारी आणि मोहन प्रकाश यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे. केसी वेणुगोपाल हे सध्या संघटनेचे सरचिटणीस असतील. ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी तर रणदीप सिंग सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे.

मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार

अजय माकन कोषाध्यक्षपदी कायम
त्याचबरोबर ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची कम्युनिकेशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर अजय माकन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) कोषाध्यक्ष असतील. पक्षाने 12 सरचिटणीस आणि 11 राज्य प्रभारी नियुक्त केले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व लोकांकडे संघटनात्मक पदे सोपवली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube