Unhappy Leaves : काम आणि कुटुंबाचा समतोल राखणे हे खूप अवघड काम आहे. या सर्व धावपळीच्या जीवनातही अनेकजण वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अनेकदा प्रयत्न करूनही दोघांची सरमिसळ होते आणि आयुष्यात येतो तो उदासपणा. हाच उदासपणा दूर करण्यासाठी एका दिग्गज कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी खास ‘अनहॅप्पी लिव्ह’ ची सुरूवात केली आहे. जर, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूड खराब असेल तर, त्याला कंपनी मूड रिफ्रेश करण्यासाठी 10 दिवसांची सुट्टी देणार आहे. काय भन्नाट आहे की नाही कल्पना. (Chinese Company Introduces Unhappy Leaves )
छ.संभाजीनगरात CM शिंदे भाजपची चाल खेळणार; वाढदिवसाच्या शुभेच्छांमागून उमेदवाराची चाचपणी
आता ही सुट्टी कोणत्या कंपनीने आणि कुठे जाहीर केली आहे असा प्रश्न पडला असेल तर, Pang Dong Lai या कंपनीने या खास सुट्टीची घोषणा केली असून, ही कंपनी चीनमधील आहे. जर तुम्ही आनंदी नसाल तर, कामावर येण्याची गरज नसल्याचे म्हणत कर्मचारी नाखूष रजेसाठी बिनधास्त अर्ज करू शकणार असून, व्यवस्थापनाकडून तो कोणत्याही प्रतिप्रश्नाशिवाय मंजूर केला जाणार आहे.
Pang Dong Lai आहे चिनी रिटेल कंपनी
कर्मचाऱ्यांसाठी अनहॅप्पी लिव्ह घेऊन येणारी Pang Dong Lai ही चिनी रिटेल कंपनी आहे. कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन यू डोंगलाई यांनी कंपनीमध्ये वर्क लाईफ बॅलन्स ठेवण्यासाठी ही अनोखी सुट्टीची पॉलिसी लागू केली आहे. कंपनीचे कर्मचारी नाखूष रजेअंतर्गत 10 दिवसांची अतिरिक्त रजा घेऊ शकतात असे डोंगलाई यांनी सांगितले. आम्हाला फार मोठी कंपनी म्हणून नावलौकित बनायचे नाहीये. आमचे कर्मचारी आनंदी असावेत अशी आमची इच्छा आहे. कर्मचाऱ्यांचे आयुष्य चांगले असेल तरच कंपनीची प्रगतीही निश्चित असते असेही ते म्हणाले.
अनहॅप्पी लिव्हशिवाय मिळतात अनेक सुविधा
Pang Dong Lai या कंपनीत नव्याने सुरू करण्यात आलेल्या अनहॅप्पी लिव्हशिवाय कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. यात कंपनीच्या धोरणानुसार कर्मचाऱ्यांना दिवसातून फक्त 7 तास काम करावे लागते. याशिवाय त्यांना वीकेंडची सुट्टीबरोबरच वार्षिक 30 ते 40 सुट्ट्या आणि लूनर न्यू ईयरसाठी अतिरिक्त 5 दिवसांची सुट्टीही दिली जाते.