Cognizant offering Rs 2.5 lakh annual salary to fresh graduates : आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठमोठे पगाराचे पॅकेज देण्यासाठी ओळखल्या जातात. मात्र सध्या एका दिग्गज आयटी कंपनीने फ्रेशर्सना ऑफर केलेल्या पॅकेजवरून जोरदार चर्चा सुरू आहे. ही दिग्गज आयटी कंपनी दुसरी तिसरी कोणती नसून, मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेली कॉग्निझंट आहे. सध्या सोशल मीडियावर कंपनीकडून ऑफर करण्यात आलेल्या ऑफरची अक्षरशः खिल्ली उडवली जात आहे.
भारीच, 10 मिनिटांत घर पोहोच मिळणार पासपोर्ट फोटो, Blinkit करणार मदत ; जाणून घ्या खर्च
नेमकं प्रकरण काय?
दिग्गज आयटी कंपन्यांमध्ये असलेल्या कॉग्निझंट कंपनीने फ्रेशर्सना तब्बल वर्षिक 2.50 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर केले आहे म्हणजेच महिन्याला फक्त 20,000 रुपये. कंपनीने दिलेल्या ऑफरनंतर सोशल मीडियावर या ऑफरची खिल्ली उडवली जात आहे. कॉग्निझंटच्या नुकत्याच आयोजित केलेल्या ऑफ-कॅम्पस भरती मोहिमेदरम्यान फ्रेशर्सना ही ऑफर देण्यात आली आहे.
🚨 Cognizant has announced an exciting off-campus mass hiring drive, welcoming applications from candidates belonging to the 2024 batch.
Application deadline – August 14.
Package – INR 2.52 LPA pic.twitter.com/Btuwf2GoEw— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) August 13, 2024
भरतीसाठी देण्यात आलेल्या पोस्टमध्ये कंपनीने म्हटले आहे की, कॉग्निझंटकडून ऑफ-कॅम्पस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट असून, या पोस्टमध्ये वर्षाला 2.52 लाखांचे पॅकेज दिले जाईल असे सांगण्यात आले आहे.कॉग्निझंट आयटी कंपनीने 2024 बॅचच्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी 2.5 लाख रुपये (अंदाजे 20,000 रुपये दरमहा) वार्षिक वेतन जाहीर केले. ही रक्कम भारताच्या आयटी क्षेत्रात साधारणपणे दिल्या जाणाऱ्या 3.5 लाख ते 4 लाख रुपयांच्या सरासरी वार्षिक पगारापेक्षा खूपच कमी आहे.
सोशल मीडियावर ऑफरची खिल्ली
कंपनीकडून ऑफर करण्यात आलेल्या पॅकेजची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार खिल्ली उडवली जात आहे. अनेक फ्रेशर्सनी या ऑफरपेक्षा बेरोजगार राहून रिल्स बनवलेले परवडेल असे म्हटले आहे. तर, ही ऑफर एका गावातील एका वर्षाचे भाडे आणि मॅगीच्या काही पॅकेटपेक्षाही कमी असल्याचे म्हटले आहे. तर, एका यूजरने वाह, वार्षिक 2 लाख? माझा ड्रायव्हर आठवड्यातून 4 दिवस काम करून यापेक्षा जास्त कमावतो असे म्हटले आहे.
अडीच लाख रुपये वार्षिक पगार खूप जास्त आहे. एवढ्या पैशात इंजिनियर काय करणार? पीएफ कापल्यानंतर हातात 18 ते 19 हजार रुपये मिळतील. यातून घरभाडे भरल्यानंतर कर्मचारी फक्त मॅगीची काही पॅकेट खरेदी करू शकतील. बहुदा कॉग्निझंट कंपनी लोक चहा आणि आशेच्या मदतीने जगू शकतात की नाही हे शोधण्यासाठी नवीन काहीतरी संशोधन करत असेल असा उपरोधित टोला एका यूजरने लगावला आहे.
सामान्यांनाही एका दिवसात वजन वाढवण किंवा कमी करणं शक्य आहे? काय सांगत मेडिकल सायन्स
अडीच लाखांचे पॅकेज देणाऱ्या CEO चा पगार डोळे दिपवणारा
एकीकडे कॉग्निझंट कंपनीकडून फ्रेशर्सना देण्यात आलेल्या पॅकेजवरून खिल्ली उडवली जात असतानाच दुसरीकडे कंपनीचे सीईओ रवि कुमार सिंगीसेट्टी यांच्या पगाराचा आकडा डोळे दिपवणारा आहे. रवि कुमार यांच्या वार्षिक पॅकेजवरील शून्य तरी मोजता येतील का? असेही काही नेटीझन्सने म्हटले आहे.
रवि कुमार यांनी ज्यादिवशी कंपनी ज्वॉईन केली होती, त्याचदिवशी ते पगाराच्या आकड्यावरुन चर्चेत आले होते. रवि कुमार हे यापूर्वी इन्फोसिसमध्ये प्रेसीडेंट होते, गतवर्षीच त्यांनी कॉग्नीझंट कंपनीत सीईओचा पदभार स्वीकारला. मुकेश अंबानी यांच्या 2020 मधील पगारापेक्षा त्यांचा पगार चारपट अधिक असल्याचं सांगण्यात येत असून, आयटी क्षेत्रात 20 वर्षांपेक्षा अधिक काळ रवि कुमार यांनी व्यतीत केला आहे.
वसंत मोरेंची अथर्व सुदामेला धमकी; नेटकऱ्यांनी तात्यांचाच घाम काढला
GQ च्या वृत्तानुसार, रवि कुमार यांनी जानेवारी महिन्यात कॉग्नीझंटमध्ये कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी, त्यांना 6 कोटी रुपये बोनस मिळाला होता, तसेच त्यांचे वार्षिक पॅकेज 70 लाख डॉलर म्हणजेच 57 कोटी रुपये एवढं आहे. त्यामुळे, इंजिनिअर्संना वार्षिक 2.5 लाख रुपये ऑफर देणाऱ्या सीईओंना नेटीझन्सकडून ट्रोल केलं जात आहे.