CCI Recruitment 2024 : तुम्ही सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे, नुकतीच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) ने विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली. या भरतीअंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager), व्यवस्थापक ट्रेनी, ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह आणि कनिष्ठ सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतासीठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, या भरतासीठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय? अर्ज फी किती आहे? याच विषयी जाणून घेऊ.
महाविकास आघाडीत छोटा भाऊ-मोठा भाऊ कोण? पृथ्वीराज चव्हाण यांचे थेट उत्तर
या भरतीची अधिसूचना 11 जून 2024 रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. 12 जून 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 2 जुलै असेल.
एकूण जागा – 214 रिक्त पदे
रिक्त पदे
असिस्टंट मॅनेजर – 1 जागा. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे वय 32 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा) – 1 पद. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे आणि वय 32 वर्षांपर्यंत असावे.
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग ) – 11 पदे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कृषी क्षेत्रात एमबीए केलेले असावे आणि वय 30 वर्षांपर्यंत असावे.
मॅनेजमेंट ट्रेनी ( अकाऊंट्स) – 20 पदे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी CA/CMA/MBA/M.Com/MMS/Commerce मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे आणि वय 30 वर्षांपर्यंत असावे.
ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह– 120 पदे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कृषी विषयात B.Sc पूर्ण केलेले असावे आणि या उमेदवाराचे वय 27 वर्षांपर्यंत असावे.
कनिष्ठ सहाय्यक (जनरल) – 20 पदे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कृषी विषयात B.Sc पूर्ण केलेले असावे आणि या उमेदवाराचे वय 27 वर्षांपर्यंत असावे.
कनिष्ठ सहाय्यक (अकाउंट्स) – 40 पदे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी B.Com पूर्ण केलेले असावे आणि वय 27 वर्षांपर्यंत असावे.
कनिष्ठ सहाय्यक (हिंदी अनुवादक) – 1 पद. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे आणि वय 27 वर्षांपर्यंत असावे.
अर्ज शुल्क –
जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये असेल.
SC/ST/ESM/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये असेल.
महत्वाचं असं सर्व उमेदवारांना अर्जाचे शुल्कही ऑनलाइन भरावे लागेल.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 2 जुलै 2024
निवड प्रक्रिया –
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी याद्वारे केली जाईल. उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी थेट अर्ज करू शकतात…
लिंक – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/89103/Index.html
अधिसूचना-
https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1111323155850324371405.pdf