महिन्याला 4 लाख पगार, अडीच लाखांची बचत, तरीही मूल नको; होम लोन कपल्सच्या आनंदावर विरजण?

Couple Family Plannig home loan महिन्याला तब्बल 4 लाख पगार आहे. तरी देखील ते मूल होऊ देत नाहीयेत... मात्र हे कपल असा विचार का करतंय?

Couple Family Plannig Home Loan

Couple Family Plannig Home Loan

Couple postpond Family Plannig due to taking four crs home by home loan : आजकालची पिढी आणि त्यात कपल्स हे आपल्या करिअर, संस्कृती, हक्क आणि पैशांच्या बाबतीत अत्यंत क्रिस्टल क्लिअर भूमिकेत असतात. याचच उदाहरण सांगायचं झालं तर फॅमिली प्लॅनिंग, मूल होऊ देण्याचा विषय आजकालचे कपल्स हे घरच्यांचा आग्रह आहे म्हणून किंवा स्वत: च्या मनाविरूद्ध घेतात असं नाही यासाठी ते अगोदर स्वत: ला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पातळीवर त्यासाठी तयार करतात मगच मूल होऊ देण्याचा विचार होतो. मात्र यातही आजकाल एक विरोधाभास पाहायला मिळत आहे. तो म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक या सर्व गोष्टी अनुकूल असल्या तरी देखील अनेक कपल्स मूल होऊ देण्याचा विचार करत नाहीयेत किंवा पुढे ढकलत आहेत. याचंच एक उदाहरण सोशल मिडीयावर समोर आलं आहे. ज्या कपलचा महिन्याला तब्बल 4 लाख पगार आहे. तरी देखील ते मूल होऊ देत नाहीयेत… मात्र हे कपल असा विचार का करतंय? यामागे कारणं काय जाणून घेऊ सविस्तर…

नेमकं प्रकरणं काय?

नुसतच लिक्डइन या नोकरीसंबंधित वेबसाईटवर SEBI रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेन्ट अॅडव्हायजर विवेक एसजी यांनी त्यांच्या अधिकृत लिंक्डइन अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये म्हटलं आहे की, त्यांच्याकडे एका कपलने डिसेंबर 2028 पर्यंत जवळपास 70 लाख रूपये कसे जमवता येतील यासाठी सल्ला मागितला होता. कारण त्यांना त्यांचा नवा फ्लॅट मिळणार आहे. यासाठी य कपलने त्यांचं फॅमिली प्लॅनिंग पुढे ढकललं आहे.

‘अशोक खरातच्या पिक्चरच्या शूटिंगमध्ये एक घोटाळा झालाय’; शहाजी बापूंनी सांगितला सांगोल्यातला ‘तो’ किस्सा

तसेच विवेक यांनी पुढे सांगितलं की, या कपलमध्ये पतीचा महिन्याचा पगार 2.35 लाख रूपये असून त्याची 84 हजारांची बचत आहे. तर पत्नीचा पगार महिन्याला 1.61 लाख असून तिची बचत 1.31 लाखांची आहे. त्यामुळे दोघे मिळून तब्बल 4 लाख कमावतात तर 2.15 लाखांची बचत करतात. यात त्यांनी 4 कोटींचं घर घेतलं आहे. तसेच रजिस्ट्रेशन आणि इंटेरिअरसाठी 70 लाख लागणार आहे. ज्यासाठी 2 कोटी पत्नीच्या वडिलांनी दिले असून 2 कोटी त्यांना 2028 पर्यंत जमवायचे आहेत.

https://www.linkedin.com/posts/viveksulegai_a-couple-earning-396-lakh-a-month-between-activity-7500080172596027392-2KQe?utm_source=social_share_send&utm_medium=android_app&rcm=ACoAADptl-YBOa8JPK1kq6mOeXcva3ZqpJE6t5s&utm_campaign=whatsapp

पुढे विवेक त्यांनी या कपल ला दिलेला अर्थिक सल्ला काय होता ते सांगतात. ते म्हणातात की, जर या कपलने पुढील 28 महिन्यांपर्यंत त्यांची पूर्ण मासिक बचत शॉर्ट-टर्म डेट इंस्ट्रुमेंट्समध्ये गुंतवली तर ते जवळपास 65 लाख जमा करू शकतात. म्हणजे ते 70 लाखांच्या जवळपास पोहचतील मात्र यासाठी त्यांना त्यांची पूर्ण मासिक बचत फक्त घरासाठीच खर्च करावी लागेल. याचा अर्थ त्या काळामध्ये त्यांना इमर्जन्सी फंड, रिटार्यमेंट आणि फॅमिली प्लॅनिंगसाठी कोणतीही बचत करत येणार नाही. किंवा त्या काळात काही संकट आलं तरी त्यांच्याकेड पैसे नसतील.

‘जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत’; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा विरोध

तसेच जर या कपलने घरासाठी 2 कोटी जमवण्यासाठी लोन घेतलं तर 8.5 टक्के व्याजदर जरी गृहीत धरले तरी देखील त्यांचा मासिक हप्ता 1,73,565 रूपये असेल. अशात जर फॅमिली प्लॅनिग केले तर प्रेगन्सीचा खर्च, मॅटरनिटी लिव्ह, पत्नीच्या करिअर ब्रेकची भीती यात सगळा भार केवळ पतीच्या पगार अन् बचतीवर येणार म्हणून म्हणून या कपलने फॅमिली प्लॅनिंग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपुरात दहीहंडीला डीजेचा दणदणाट; नितीन गडकरींची उपस्थिती, डेसिबल तपासण्यासाठी पोलिस घटनास्थळी

आता हे झालं या कपलं आर्थिक गणित जे 4 लाख पगार असूनही फक्त आणि फक्त घर याच गोष्टीसाठी केलं गेलं मात्र जीवन जगताना लागणाऱ्या दैनंदिन तसेच वार्षिक , चैनीच्या गरजा याचा या मध्ये कुठेही उल्लेख नाहीये. तसेच या सर्व अर्थिक गणितामध्ये ते आपल्या फॅमिली प्लॅनिंगला पुढे ढकलत आहेत. म्हणजे त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा ते विचार करत आहेत का? असा सवाल उपस्थित होते.

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

कारण फॅमिली प्लॅनिंगला उशीर करणे म्हणजे आरोग्याचा दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. असं तज्ज्ञ सांगतात कारण, पती आणि विशेषत: पत्नीचं होणारं वय, फिटनेस आणि प्रेगन्सीमध्ये येणारे अडथळे हे देखील आजकाल सर्वांनाच निर्माण होणाऱ्या समस्या झाल्या आहेत.

‘ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही’; जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप

यावर विवेक यांनी देखील त्यांना सल्ला दिला की, मी घर घेण्याच्या विरोधात नाही. मात्र त्यासोबतच हा देखील विचार केला गेला पाहिजे की, जर दोघांपैकी एकाचा पगार बंद झाला तर तुम्ही कर्जाचे हप्ते आणि घरखर्च दोन्ही एकाच्या पागरात भागवू शकाल का? तसेच घर असं घ्यावं जे एकाच्याच पगावर घेता येऊ शकेल.

 

Exit mobile version