Download App

Covishield लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या अन् हार्ट अटॅक! सर्वोच्च न्यायालयात याचिका, कंपनीचीही कबुली?

ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लसीमुळे मृत्यू होत असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलीयं. मात्र, या लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नसल्याचं तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

strong>Covishield Vaccine : कोरोनाचा (Corona) सामना करण्यासाठी भारतातल्या नागरिकांना लसीकरणासाठी दोनच पर्याय होते. एक म्हणजे कोव्हॅक्सिन (COVAXIN) तर दुसरा म्हणजे कोविशिल्ड (Covishield Vaccine) लस. तुमच्यापैकी अनेकांनी कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनची लस टोचून घेतली असेल. पण तुम्हाला माहितीये का? कोविशिल्ड लसीमुळे अनेकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लसीमुळे मृत्यू होत असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलीयं. त्यामुळे खरंच कोविशिल्डमुळे मृत्यूला सामोरं जावं लागतंय का? ज्यांनी कोविशिल्ड लस घेतलीयं त्यांना भीती आहे का? कोवीशिल्ड लसीवर तज्ञांचं मत काय आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आपण या सविस्तर जाणून घेणार आहोत….

‘संयुक्त महाराष्ट्र’ चळवळीचा लढा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार, नवीन मराठी चित्रपटाची घोषणा

युकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात कोविशिल्ड लस बनवणाऱ्या ॲस्ट्राझेनेका कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. कोविशिल्ड लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू होत असल्याचा दावा या महिलेच्या कुटुंबियांनी दाखल याचिकेत केलायं. सोबतच या लसीमुळे अनेक दुष्परिणाम होत असल्याचा दावा कुटुंबियांनी केलायं.

कुटुंबियाने ब्रिटनच्या न्यायालयाच याचिका दाखल केल्यानंतर कोविशिल्ड लसीमुळे शरीराच्या कोणत्याही भागात रक्ताच्या गुठळ्या होण्याचा ‘दुर्मिळ दुष्परिणाम’ होऊ शकतो, अशी कबुली कोविशिल्ड लस उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेनेकाने दिलीयं.

मोदींचा पवारांवर वार, ठाकरेंचा पलटवार; म्हणाले, ‘मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा’

तसेच एप्रिल 2021 मध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीला ही लस मिळाली. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचा थेट परिणाम त्याच्या मेंदूवर झाला. याशिवाय स्कॉटच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्रावही झाला. अहवालानुसार, डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला सांगितले की ते स्कॉटला वाचवू शकणार नाहीत. त्यानंतर जेमी स्कॉट यांच्या पत्नीने न्यायालयात याचिका दाखल केली.

ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीने काय म्हटलं?
ज्या कुटुंबातील लोकं मृत्यू पावले आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला सहानूभुती असून रुग्णांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. लसीकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांसाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. क्लिनिकल चाचण्या आणि डेटाच्या आधारे आमची लस सुरक्षित आहे. लसीवर संशोधन करणाऱ्या संस्था सांगतात की लसीचे फायदे हे दुर्मिळ जोखमींपेक्षा जास्त आहेत. अतिशय दुर्मिळ प्रमाणात कोविशिल्ड लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात, असं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं.

Sonu Sood: चाहत्यांकडून सोनूला मिळालं अनोखं गिफ्ट, ‘थेट 1500 किमी धावत आला आणि…’

तज्ञांचं मत काय?
जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागात रक्ताची गुठळी तयार होते तेव्हा त्याला थ्रोम्बोसिस सिंड्रोम म्हणजेच TTS म्हणतात. कोरोनाची लस येण्यापूर्वीही ही समस्या निर्माण होत आहे. जेव्हा लसीकरणामुळे थ्रोम्बोसिस सिंड्रोमची समस्या उद्भवते तेव्हा त्याला लस प्रेरित थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजेच VITT म्हणतात. कोविशिल्डमुळे अनेक लोकांमध्ये हा दुष्परिणाम दिसून आला आहे. हे दुष्परिणाम केवळ दुर्मिळ लोकांमध्येच दिसून आले आहेत. यामुळे शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण अचानक कमी होते, ज्यामुळे शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध होतो. असं झाल्यास रुग्णाला ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणूनच टीटीएस मानवांसाठी घातक ठरू शकते, असं मत एपिडेमियोलॉजिस्ट चंद्रकांत लहरिया यांनी मांडलंयं.

डॉ. रवी गोडसेंनी तीन मुद्द्यात क्लिअर केलं :
-लसीमुळे दुष्परिणाम व्हायचा असता तर तो शक्यतो पहिला डोस घेतल्यानंतर तीन दिवसाच्या आत झाला असता. तुम्हाला पहिला डोस घेऊन तीन वर्षे होऊन गेली, त्यामुळे घाबरू नका.
-हा धोका एवढा दुर्मिळ आहे की, एक कोटी लोकांमध्ये 16 जणांना होत असेल, आपण कोटी-लाखात एक तरी आहोत का? त्यामुळे घाबरू नागरिकांनी घाबरु नये.
-दुष्परिणामांचं प्रमाण शक्यतो तरुणींमध्ये जास्त आहे. तुमचं वय 18 ते 30 असेल आणि तुम्ही तरुणी असाल तर कोविशील्ड ऐवजी कोवॅक्सीन लस घ्या, असं आवाहन मी केलं होतं. जरी कोविशिल्ड लस घेतली तरीही घाबरु नका, हा धोका आता टळला असल्याचं डॉ. रवी गोडसेंनी सांगितलं.

दरम्यान, ॲस्ट्राझेनेका कंपनीने एप्रिल 2021 मध्येच उत्पादनाच्या माहितीमध्ये काही प्रकरणांमध्ये टीटीएसचा धोका समाविष्ट केला होता. अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, कोरोना महामारीच्या काळात ॲस्ट्राझेनेका लस लागू केल्यानंतर पहिल्याच वर्षात जवळपास 60 लाख लोकांचे प्राण वाचवले असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. तर भारतात अद्याप तरी असा धोका आढळून आला नसल्याने भारतीय नागरिकांनी घाबरु नये, असा सल्ला तज्ञांकडून देण्यात आलंय.

follow us