राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला; नवीन 70 रुग्ण आढळले
Coronavirus : मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना विषाणुने डोकं वर काढल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. काल नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनाचे (Coronavirus) 131 रुग्ण आढळल्यानंतर आज राज्यात नव्या 70 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यात आत्तापर्यंत 731 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 130 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर 32 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
Goldy Brar : गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणारा गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित
मुंबईत आज कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आले असून कोरोनासाठी राखून ठेवण्यात आलेल्या 4215 खाटांपैकी 15 खाटांवर रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. तर दिवसभरात मुंबईत 126 चाचण्या करण्यात आल्या असून या चाचण्यांमध्ये एकही रुग्ण कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 बाधित आढळून नसल्याने ही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
लगीनघाई! नव्या वर्षात रकुल प्रीत सिंह अडकणार लग्नबंधनात! ‘या’ दिवशी घेणार सात फेरे
आत्तापर्यंत राज्यातील सर्वाधिक रुग्ण हे ठाण्यातच आढळून आले असून आत्तापर्यंत ठाण्यात 190 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याचं दिसून आलं होतं. मुंबईत काल 137 तर पुण्यातही 126 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची नोंद होती. पुण्यातही J1 व्हेरिएंटचे सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सध्या पुण्यात 15 J1 व्हेरियंट 1 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्गात आढळला होता. तर राज्यात आत्तापर्यंत JN.1 च्या 29 रुग्णांची नोंद झाली आहे.
Chief Secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती, मनोज सौनिक यांना मुदतवाढ नाही
वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, नव्या व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या. शक्यतो असे कार्यक्रम टाळा. आणि गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर काळजी घ्या. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये याबाबत मॉक ड्रिल घेतलं जातं आहे, असं सावंत म्हणाले आहेत. तसेच राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नवीन टास्क फोर्सची निर्मीती करण्यात आली असून या टास्क फोर्सचे नेतृत्व आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर करीत आहेत.
दरम्यान, मागील 24 तासांत देशात कोविड-19 चे 656 नवीन रुग्ण आढळले होते. त्यापैकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. देशातील केरळ राज्यात आत्तापर्यंत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.