धडकी भरवणारी बातमी! नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनाबाधितांचा आकडा वाढला…
CoronaVirus : राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याचं समोर आलं आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येलाच धडकी भरवणारा आकडा समोर आल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात आज नव्या 131 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता सध्या राज्यात 701 कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. तर कोरोनाचा नवा व्हेरियंटचे 29 रुग्ण आढळून आले आहेत.
Beed violence : बीड जाळपोळप्रकरणी आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक; एसपी म्हणाले, अनेक आरोपी फरार
आत्तापर्यंत राज्यातील सर्वाधिक रुग्ण हे ठाण्यातच आढळून आले आहेत. आत्तापर्यंत ठाण्यात 190 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. मुंबईत 137 तर पुण्यातही 126 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच पुण्यातही J1 व्हेरिएंटचे सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सध्या पुण्यात 15 J1 व्हेरियंट 1 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्गात आढळला होता. तर राज्यात आत्तापर्यंत JN.1 च्या 29 रुग्णांची नोंद झाली आहे.
‘DNA किट्स नाहीत ही आरोपींनी मदत करण्याची योजनाच’; राऊतांची फडणवीसांना थेट पत्रच
वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, नव्या व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या. शक्यतो असे कार्यक्रम टाळा. आणि गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर काळजी घ्या. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये याबाबत मॉक ड्रिल घेतलं जातं आहे, असं सावंत म्हणाले आहेत. तसेच राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नवीन टास्क फोर्सची निर्मीती करण्यात आली असून या टास्क फोर्सचे नेतृत्व आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर करीत आहेत.
अलिशान घर, भरमसाठ कर्ज अन् दिवाळखोरीचा अर्ज : भारतीय वंशांच्या कुटुंबाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 चे 656 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात 3,742 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण केरळमधील आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासात 128 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळमध्ये 3000 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. कर्नाटकात 271 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कर्नाटकात 96 नवे रुग्ण आढळले आहेत.
मागील रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रात 5, पुणे महापालिका क्षेत्रात 2, पुणे ग्रामीण भागात 1 आणि अकोला महापालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढळून आला. यापैकी 8 पुरुष आणि 1 महिला होते. या रुग्णांपैकी एक 9 वर्षांचा मुलगा असून आणि 21 वर्षांच्या महिलेलाही संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. यामध्ये एक 28 वर्षांचा तरुण आणि उर्वरित सहा जण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आहेत.