अलिशान घर, भरमसाठ कर्ज अन् दिवाळखोरीचा अर्ज : भारतीय वंशांच्या कुटुंबाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

अलिशान घर, भरमसाठ कर्ज अन् दिवाळखोरीचा अर्ज : भारतीय वंशांच्या कुटुंबाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

मॅसॅच्युसेट्स : अमेरिकेतील (America) मॅसॅच्युसेट्स येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कुटुंबाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. राहत्या घरात तिघांचेही मृतदेह आढळून आले. राकेश कमल, त्यांची पत्नी टीना आणि त्यांची 18 वर्षांची मुलगी एरियाना अशी मृतांची नावे आहेत. तिघांचा मृत्यू कधी आणि कशामुळे झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Dead bodies of 3 members of an Indian origin family living in Massachusetts, America, were found in their house.)

अधिक माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास (अमेरिकेची वेळ) कमल कुटुंबातील एक नातेवाईक त्यांच्या घरी गेला. यावेळी त्यांना एक मृतदेह दिसला. नातेवाईकाने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर त्यांना घरात उर्वरित दोन मृतदेह आढळून आले. डेली मेलच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी हे अंतर्गत वादाचे प्रकरण असावे असे म्हंटले आहे. मात्र, घरात तोडफोडीच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर पलटवार! तुफान बॉम्बफेकीत 20 जणांचा मृत्यू

अलिशान घर, भरमसाठ कर्ज अन् दिवाळखोरीसाठी अर्ज

कमल कुटुंब हे मॅसॅच्युसेट्समधील डोव्हर भागात अत्यंत पॉश परिसरात राहण्यासाठी होते. सुमारे 27 खोल्यांचे त्यांचे घरही अत्यंत अलिशान होते. त्यांच्या बंगल्याची किंमत 41 कोटी रुपये आहे. मुलगी एरियाना हिनेही मॅसॅच्युसेट्समधील सर्वात महागड्या शाळांपैकी एक असलेल्या मिल्टन अकादमीमध्ये शिक्षण घेतले. पण त्याचवेळी कमल कुटुंबावर सुमारे 83 कोटी रुपयांचे कर्ज होते.

मागील काही दिवसांपासून ते आर्थिक संकटातून जात होते. राकेश आणि टीना यांनी नुकतेच दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या बंगल्याचाही लिलाव होणार होता. मात्र, योग्य फॉर्म आणि कागदपत्रे नसल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. टीनाने 2016 मध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे ग्रेड सुधारण्यास मदत करणारी स्वतःची कंपनी उघडली होती. मात्र 2021 मध्ये ती बंद पडली. राकेश कमल हे या कंपनीचे सीओओ होते.

भारताला पुन्हा धक्का : कतारमधील नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना तीन ते 25 वर्षांचा तुरुंगवास?

मॅसॅच्युसेट्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोव्हरचा हा भाग अत्यंत सुरक्षित मानला जातो. या परिसरात हिंसाचाराच्या फार कमी घटनांची नोंद झाली आहे. डोव्हरमध्ये 2020 मध्ये हत्येशी संबंधित शेवटचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेली 58 वर्षीय डॉक्टरने पत्नी कॅथलीनची हत्या करून तिचा मृतदेह तलावात फेकून दिला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube