काळजी घ्या! राज्यात एकाच दिवशी आढळले 87 कोरोना रुग्ण, दोघांचा मृत्यू

  • Written By: Published:
काळजी घ्या! राज्यात एकाच दिवशी आढळले 87 कोरोना रुग्ण, दोघांचा मृत्यू

corona virus : कोरोना व्हायरसने (corona virus) पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. देशासह राज्यात हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा सब व्हेरियंट JN.1 चा प्रसार वेगाऩं पसरू लागल्यानं कोरोनाचाही संसर्ग होऊ लागला. बुधवारी राज्यात 87 कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळं राज्यातील एकूण बाधितांची संख्या 81,72,287 वर पोहोचली आहे.

‘दादांचं बंड स्वार्थासाठी’ म्हणणाऱ्या शालिनीताईंना चपराक; चाकणकर म्हणाल्या, ‘नैराश्यपोटीच..,’ 

मंगळवारी 14 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण 80,23,456 रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्क्यांवर पोहोचले आहे. मुंबईत 19 रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णांची संख्या 11,64,108 झाली आहे.

IND vs SA Test : डीन एल्गरचे दमदार शतक, यजमान संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल 

ख्रिसमसच्या आधी जेएन.१ कोरोना प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली जात होती, मात्र आता कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे देशभरात चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलीकडे JN.1 ला BA.2.86 पेक्षा वेगळE आणि व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हटले आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात ‘जेएन.१’ विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे सांगण्यात आले. तर दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.81 टक्के आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 8,75,80,789 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,72,287 (9.33 टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी राज्यात 10,864 चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी 1,949 RTPCR आणि 8,915 RAT चाचण्या प्रयोगशाळेत नोंदवण्यात आल्या. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना कोरोना चाचणी वाढवण्यास आणि कोरोनाशी संबंधित कोणत्याही नवीन घडामोडींवर बारीक नजर ठेवण्यास सांगितले आहे.

आतापर्यंत सक्रिय रुग्ण: 194

होम आयसोलेशनमधील रुग्ण: 162 (83.5%)

रुग्णालयात दाखल रुग्ण: 32 (16.5%)

ICU मध्ये नसलेले रुग्ण: 25 (12.9%)

ICU मधील रुग्ण: 07 (3.6%)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube