महाराष्ट्रात कोरोनामुळे पहिला मृत्यू…, देशात 1045 सक्रिय रुग्ण; जाणून घ्या ताजे अपडेट

Covid Alert : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 1045 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात (Maharashtra Corona Update) कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan-Dombivli Municipal Corporation) कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. ही महिला एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीसह(Delhi) , महाराष्ट्र (Maharashtra) , कर्नाटक (Karnataka) आणि केरळमध्ये (Kerala) दररोज रुग्णांची वाढ होत असल्याने या राज्यांना हाय अलर्टवर टाकण्यात आले आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्येही 8 नवीन कोरोना रुग्णांची पुष्टी झाली आहे. या रुग्णांवर घरीच आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ
केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण
केरळ हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. येथे रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे 430 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्र, बेंगळुरू आणि दिल्लीमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासांत मुंबईत 43 नवीन रुग्ण आढळले. 26 मे पर्यंत, देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1004 आहे. केरळमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.