लगीनघाई! नव्या वर्षात रकुल प्रीत सिंह अडकणार लग्नबंधनात! ‘या’ दिवशी घेणार सात फेरे
Rakul Preet Singh Wedding: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) सध्या नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनसाठी सुट्टीवर गेली आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत ती परदेशात सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत, यामध्ये ती मोनो बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताच अभिनेत्रींच्या लग्नाच्या चर्चेला जोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वर्षात रकुलच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. या वर्षी ती बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत (Jackie Bhagnani) लग्न करणार आहे. मात्र याबाबत या जोडप्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
View this post on Instagram
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टचा हवाला देत रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी फेब्रुवारी 2024 मध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्री डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. गोव्यातील झिरोडमध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत हँग आउट करणार आहे. सध्या ती जॅकीसोबत थायलंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. ती तिच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवसही तिथे सेलिब्रेट करणार असल्याचं बोललं जात आहे.
रकुल प्रीत सिंहने 2021 मध्ये जॅकी भगनानीवर तिचे प्रेम व्यक्त केले होते. तिच्या वाढदिवशी अभिनेत्रीने जॅकीसोबतचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली होती, त्यामध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. रकुलने जॅकी भगनानीला तिची सर्वोत्तम आणि खास भेट असल्याचे सांगितले होते. जॅकी हा व्यवसायाने निर्माता असून तो अभिनेत्रीचा शेजारीही होता. पण, या काळात ते कधीच एकमेकांशी बोलले नाहीत. लॉकडाऊनच्या काळात कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून त्यांची भेट झाली. इथूनच त्यांच्या भेटीगाठी आणि चर्चेची मालिका सुरू झाली.
John Abraham: जॉन अब्राहमने खरेदी केला मुंबईत कोट्यवधींचा बंगला, किंमत ऐकून बसेल धक्का
रकुल प्रीत सिंगचे आयुष्य: याशिवाय रकुल प्रीत सिंहच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिने हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्रीने 2009 मध्ये कन्नड चित्रपट ‘गिल्ली’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी 2014 मध्ये पहिला हिंदी चित्रपट यारियां’ होते.