Download App

Deepfake Video : AI द्वारे फेक व्हिडीओ, मोठं-मोठे सेलिब्रेटी अडकले जाळ्यात; तुम्ही सेफ आहात?

Deepfake Video : सोशल मीडियावर डिपफेक व्हिडीओचं प्रमाण वाढलं आहे. (Deepfake Video) दररोज आपण अशा प्रकारचा कंटेंट पाहत आहोत. तर नुकतंच दक्षिणात्य तसेच बॉलीवूडची देखील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीप फेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांचे देखील अशा प्रकारचे व्हिडिओ आपण पाहतो. सध्या निवडणुकांचा काळ आहे. अनेक राज्यात निवडणूक आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कंटेंटमुळे अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे ही दीप फेक टेक्नॉलॉजी काय आहे? त्याचे धोके काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ. या टेक्नॉलॉजीनुसार माणसांचे चेहरे, आवाज याचा वापर करून फेक फोटो, व्हिडिओ, ऑडिओ तयार करण्यात येतात. ही टेक्नॉलॉजी सर्वात जास्त व्हिडिओसाठी वापरली जाते. याचे उदाहरण ठरले रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ.

डीपफेक तंत्रज्ञान म्हणजे काय?

डीपफेक या तंत्रज्ञानानुसार तुमचे फोटो व्हिडिओ आणि आवाजामध्ये बारीक बदल केले जातात. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. त्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुमचा फोटो लावून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. हे व्हिडिओ इतके हुबेहूब असतात की, खरा कोणता आणि खोटा कोणताही ओळख नाही अवघड जातं.

दरम्यान यावर सरकारकडून देखील पावलं उचलली जात आहेत. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री राजू चंद्रशेखर यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिलाय. त्यांनी सांगितलं की, सरकारने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2000 नुसार तसेच आयटी नियम 2021 नुसार सरकारकडून ट्रासबिलिटी प्रोविजनचा देखील वापर करण्यात येईल. यामध्ये अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीची माहिती मागून घेऊन त्याच्यावर कारवाई आणि दंड देखील ठोठावला जाणार आहे.

डीपफेक तंत्रज्ञानापासून कसं वाचायचं?

डीपफेक या टेक्नॉलॉजी पासून वाचण्यासाठी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला फोटो शेअर करताना काळजी घ्या. असा प्रकार तुमच्या सोबत घडल्यास तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा. तर हा डीपफेक काँटेंट ओळखण्यासाठी तुम्ही संबंधित व्हिडिओमधील व्यक्तीचे स्किनचा कलर, अंगाची ठेवण यातील फरक, डोळ्यांजवळची वर्तुळ, डोळ्यांची होणारी उघडझाप किंवा नजर, तोंड आणि चेहऱ्याचे हावभाव, चेहरा आणि ओठांचा ताळमेळ नसणे, चेहरा आणि केसांचा ताळमेळ नसणे, चेहऱ्यावरील खुणा मॅच न होणे. या सर्व गोष्टींच्या तपासणी आणि तुम्ही हा व्हिडिओ फेक आहे किंवा नाही हे जाणून घेऊ शकता.

Tags

follow us