Download App

ठाकरे बंधूंचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन! विजयी मेळ्यावर काय म्हणाले?

हिंदी लादण्याचा विरोध करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या चालवलेला भाषा हक्कांचा

MK Stalin on Thackeray : आज मुंबईमध्ये ठाकरे बंधुंच्या (Thackeray) उपस्थितीत विजयी मेळावा झाला. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. दरम्यान, आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आज मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्याचं कौतुक केलं आहे, त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

हिंदी लादण्याचा विरोध करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या चालवलेला भाषा हक्कांचा संघर्ष राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात निषेधाच्या वादळासारखा जोर धरू लागला आहे. तामिळच्या शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवले तरच निधी दिला जाईल असे सांगून बेकायदेशीर आणि अराजकतेने वागणाऱ्या भाजपला लोकांच्या बंडाच्या भीतीने महाराष्ट्रात दुसऱ्यांदा माघार घ्यावी लागली आहे.

उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, तर राज ठाकरेंची प्रशंसा; शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर

हिंदी लादण्याच्या विरोधात बंधू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत झालेल्या विजयी रॅलीतील उत्साह आणि प्रभावी वक्तृत्व आपल्याला प्रचंड उत्साहाने भरून टाकते. मला चांगलेच माहिती आहे की, पूर्णवेळ हिंदी आणि संस्कृतच्या प्रचाराला प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत अस म्हणत उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवली जाते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

हिंदी वर्चस्वाविरुद्ध तामिळनाडूच्या लोकांनी चालवलेला संघर्ष केवळ भावनिकच नाही तर बौद्धिक देखील आहे. ते तार्किक आहे. ते भारताच्या बहुलवादी संस्कृतीच्या रक्षणासाठी आहे. ते द्वेषाने प्रेरित नाही. हिंदी लादल्यामुळे नष्ट होणाऱ्या असंख्य भारतीय भाषांच्या इतिहासाची माहिती नसलेले आणि भारताला हिंदी राष्ट्रात बदलण्याचा अजेंडा समजून घेण्यात अयशस्वी झालेले काही भोळे लोक ‘हिंदी शिकल्याने तुम्हाला नोकऱ्या मिळतील’ असं बोलतात असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

follow us