Diwali Date 2024 Update : देशातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीची (Diwali 2024) ओळख आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी करण्यात येते मात्र यंदा दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही लोकांचे मते दिवाळी 31 ऑक्टोबरला साजरी करण्यात यावी तर काही लोकांच्या मते दिवाळी 1 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात यावी. यावेळी अमावस्या तिथी दोन दिवसांवर आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद (Jagadguru Shankaracharya Swami Avimukteshwarananda) यांनी सांगितले की, यावेळी दिवाळीचा पवित्र सण 31 ऑक्टोबरला साजरा करणे योग्य ठरेल. अमावस्या तिथी दिवाळीच्या मध्यरात्री पाळावी आणि प्रदोषकाळातही अमावस्या तिथी पाळावी असं जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शास्त्रात असेही सांगितले आहे की, जेव्हा अमावस्या दोन प्रदोषांमध्ये असते तेव्हा उदया तिथीला दिवाळी साजरी करावी. त्यामुळेच काही लोक दिवाळी 1 ला होणार असल्याचे सांगत आहेत. मात्र या शास्त्रांमध्ये रजनीलाही अमावस्येला जोडावे, असा उल्लेख करण्यात आला आहे असं देखील ते म्हणाले. तसेच दुसऱ्या दिवसाची अमावस्या प्रदोष कालात आहे, परंतु वज रजनी (रात्री) ला स्पर्श करत नाही. त्यामुळे 31 तारखेलाच दिवाळीचा सण साजरा करावा. असेही ते म्हणाले.
दिवाळी हा पवित्र सण आहे. या शुभ दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी दीपदानही केले जाते. या दिवशी, निशिथ कालमध्ये म्हणजे मध्यरात्री, देवी लक्ष्मी स्वत: प्रवासाला निघते आणि पाहते की कोण तिची वाट पाहत आहे.
‘मविआ’ च्या शिलेदारांसाठी राहुल गांधी मैदानात, ‘या’ दिवशी फोडणार प्रचाराचा नारळ
अशा परिस्थितीत ज्यांच्या घरात देवीची पूजा केली जाते किंवा दिवा लावला जातो किंवा ज्यांच्या दारात रांगोळी सजवली जाते, ते लोक देवीच्या स्वागतासाठी दागिन्यांनी सजलेले उभे राहतात आणि देवी त्यांच्या घरात एक वर्षासाठी प्रवेश करते. असेही ते म्हणाले.