Petrol Price : दिवाळीत आली खास बातमी! पेट्रोल अन् डिझेल स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती

  • Written By: Published:
Petrol Price : दिवाळीत आली खास बातमी! पेट्रोल अन् डिझेल स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती

Petroleum Ministe Petrol Diesel Price Today : येत्या काही दिवसांत पेट्रोलच्या किमतीत 5 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. तर डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून हे संकेत दिले आहेत. गेल्या मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात झाली होती.

सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलरवर दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत हरदीप सिंग पुरी यांनी कोणते संकेत दिले आहेत? हरदीप सिंग पुरी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर सांगितले की, धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर, तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप डीलर्सना दिलेल्या भेटवस्तूचे हार्दिक स्वागत. 7 वर्षांपासून सुरू असलेली मागणी पूर्ण झाली आहे.

Video : शिवसेनेच्या माजी आमदाराची जीभ घसरली; शिवसेना एक सुंदर स्त्री मात्र लोक आता

आता ग्राहकांना चांगली सेवा मिळेल, पण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही. दुर्गम ठिकाणी (तेल विपणन कंपन्यांच्या पेट्रोल आणि डिझेल डेपोपासून दूर) असलेल्या ग्राहकांना लाभ देण्यासाठी आंतरराज्य मालवाहतुक सुलभ करण्यासाठी तेल कंपन्यांनीही एक मोठा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकते

आपल्या एक्स हँडलवर माहिती देताना हरदीप सिंग पुरी म्हणाले की, ओडिशाच्या मलकानगिरीच्या कुननपल्ली आणि कालीमेलामध्ये पेट्रोलचे दर 4.69 रुपये आणि 4.55 रुपये आणि डिझेलच्या दरात 4.45 रुपये आणि 4.45 रुपयांनी कपात केली जाईल. तसेच छत्तीसगडच्या सुकमामध्ये पेट्रोलच्या दरात 2.09 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 2.02 रुपयांनी घट होणार आहे.

गेल्या 7 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीच्या पूर्ततेमुळे पेट्रोल पंप डीलर्स आणि देशभरातील 83,000 हून अधिक पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या सुमारे 10 लाख कर्मचाऱ्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. 6 राज्यांतील अनेक शहरांमध्ये पेट्रोल स्वस्त होऊ शकते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या