दिवाळीत हृदयाचं आरोग्य जपा; कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराच!

दिवाळीत हृदयाचं आरोग्य जपा; कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराच!

How to Control cholesterol in Festive Season : दिवाळीचा सण अगदी तोंडावर (Diwali 2024) आला आहे. त्यामुळे घरोघर गोडधोड आणि मिठाईचा बेत आखला जात आहे. दिवाळीत मिठाईची रेलचेल असते. भरपूर खालीही जाते. मात्र सण गोड करण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. या दिवसांत शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) वाढणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींकडे जास्त लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.

दिवाळी सण आनंदाचा आहे मात्र या उत्सवाचा रंग फिका होणार नाही यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सणासुदीच्या दिवसांत लोक भरपूर गोड पदार्थ खातात. याच खाण्यापिण्याच्या नादात शरीरात कोलस्टेरॉलचे प्रमाण वेगाने वाढते. यामुळे हृदयाच्या आरोग्यावर (Heart Disease) अतिशय विपरीत परिणाम होतो.

सावधान! भारतात वेगाने पसरतोय मधुमेह, पण का? ICMR च्या रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर

वैद्यकिय तज्ज्ञ सांगतात की सणांच्या दिवसात बहुतांश घरांतील ज्येष्ठ व्यक्ती गोड पदार्थ जास्त प्रमाणात खातात. हे सर्व पदार्थ मर्यादेपेक्षा जास्त खाल्ले गेले तर शरीरात एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल वाढण्याची दाट शक्यता राहते. याच कारणामुळे दिवाळी किंवा अन्य कोणत्याही सणाच्या प्रसंगी खाण्यापिण्याच्या सवयी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. गोड पदार्थ खा पण अती प्रमाणात खाऊ नका. याबरोबरच कॉलेस्टेरॉल वाढणार नाही यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवा.

लिक्वीड डाएट घ्या

या काळात खाद्य पदार्थांच्या माध्यमातून कोलेस्टेरॉल वाढणार नाही यासाठी पुरेशा प्रमाणात लिक्वीड डाएट घेत रहा. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित होण्यास मदत मिळते. प्रोसेस केलेला ज्यूस किंवा गोड पेय पदार्थ घेण्याऐवजी नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, लस्सी यांसारखे पदार्थ घेऊ शकता.

तळलेले पदार्थ स्वादिष्ट असतात. परंतु हे पदार्थ शरीरासाठी अत्यंत नुकसानदायक ठरतात. जास्त तळलेले, गोड आणि जास्त कॅलरी असणारे खाद्य पदार्थ खाणे टाळा. या याऐवजी हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांचा आहारात समावेश करा.

अती खाणे टाळा

सणांच्या दिवसात बहुतांश लोक अती प्रमाणात खातात. जितकी भूक आहे त्याचा विचार न करता जास्त खातात. यामुळे मग ऍसिडिटी, पोटदुखी, अपचन अशा समस्या निर्माण होतात. या समस्या टाळायच्या असतील तर अती प्रमाणात खाऊ नका. काही तासांत थोडे थोडे खाण्याची सवय लावून घ्या.

बापरे! 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुले लठ्ठपणाच्या आहारी; जाणून घ्या, वाढत्या आजाराची कारणे

ॲक्टिव्ह राहा

सणांच्या दिवसात पोटभर खाल्ल्याने सुस्ती येणे सहाजिक आहे. पण शारीरिक हालचाली होत राहतील याची काळजी घ्या. यासाठी काही कामे करायची असतील तर वाहनांचा वापर करू नका. भाजी किंवा एखादी वस्तू आणायला जायचं असेल तर पायी चालत जा. दररोज किमान अर्धा तास पायी चालण्याची सवय लावून घ्या. सणासुदीच्या काळात आरोग्य खराब होणार नाही यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. सण आनंदाचा आहे म्हणून स्वतः ची काळजी घ्या आणि सणही आनंदात साजरा करा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube