रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सर होतो? तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर…

sleeping in a bra मुळे थेट कॅन्सर होऊ शकतो. असं सांगितलं जात मात्र दाव्यामागे खरोखर किती तथ्य आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Sleeping In A Bra

Sleeping In A Bra

Does sleeping in a bra at night cause cancer What do experts say : सोशल मीडियावर आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यापैकी काही गोष्टी लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या असतात. यातीलच एक गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी झोपताना ब्रा घालून झोपने योग्य आहे की अयोग्य यामुळे थेट कॅन्सर होऊ शकतो. असंही अनेकदा सांगितलं जात मात्र या विधानामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण या दाव्यामागे खरोखर किती तथ्य आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

व्हिडीओजमध्ये नेमका काय दावा केला?

या व्हिडीओजमध्ये सांगितले गेले आहे की, रात्री झोपेच्या वेळी शरीर नैसर्गिकरीत्या डिटॉक्स प्रक्रियेत कार्यरत असते. म्हणजेच शरीरात जमा झालेले काही अपायकारक घटक बाहेर टाकण्याचे काम चालू असते. त्यांच्या म्हणण्यानुसार, बगल, स्तन आणि छातीच्या आसपास असलेले लिम्फ नोड्स (लसीका ग्रंथी) शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.मात्र जर महिला रात्री खूप घट्ट किंवा वायर असलेली ब्रा घालून झोपत असतील, तर या लिम्फच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सूज येणे, द्रव साचणे आणि दीर्घकाळात स्तनांच्या ऊतींवर परिणाम होऊन कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

वैद्यकीय विज्ञान काय सांगते?

हा दावा ऐकायला गंभीर वाटत असला तरी आधुनिक वैद्यकीय विज्ञान याला मान्यता देत नाही. ब्रा आणि स्तन कॅन्सर यांच्यात संबंध असल्याचा दावा प्रथम 1995 मध्ये समोर आला होता. ड्रेस टू किल या पुस्तकात लेखक सिडने रॉस सिंगर आणि सोमा ग्रिस्मायर यांनी ब्रा वापर आणि स्तन कॅन्सर यामध्ये संबंध असल्याचा दावा केला होता. नंतर 2017 मध्ये या पुस्तकाचा दुसरा भागही प्रकाशित झाला. मात्र अनेक तज्ज्ञांनी या पुस्तकातील दावे वैज्ञानिकदृष्ट्या अपुरे आणि चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे मत

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या माहितीनुसार, ब्रा घातल्यामुळे लिम्फचा प्रवाह बंद होतो किंवा त्यामुळे स्तन कॅन्सर होतो, असे सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. तसेच National Institutes of Health नेही स्पष्ट केले आहे की, ब्रा वापरणे, घाम रोखणारी उत्पादने वापरणे किंवा स्तन प्रत्यारोपण (ब्रेस्ट इम्प्लांट्स) यांचा स्तन कॅन्सरच्या धोक्याशी थेट संबंध नाही.

अफवा आणि वास्तव

सोशल मीडियावर आरोग्यविषयक माहिती वेगाने पसरते, पण ती नेहमीच वैज्ञानिकदृष्ट्या खरी असेल असे नाही. रात्री ब्रा घालून झोपल्याने स्तन कॅन्सर होतो, हा दावा सध्या उपलब्ध वैज्ञानिक संशोधनानुसार चुकीचा मानला जातो. तथापि, खूप घट्ट किंवा अस्वस्थ ब्रा घालून झोपल्यास अस्वस्थता, त्वचेची जळजळ किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरामदायी कपडे वापरणे हा वैयक्तिक निवडीचा भाग आहे, पण कॅन्सरशी त्याचा संबंध असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.

 

Exit mobile version